Sangali muncipal Corporation Budget 2024 : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Corporation Budget : पदाधिकारीच नसल्याने 'फुगीर योजनांना' कात्री ; सांगली महापालिकेचे 823 कोटींचे बजेट सादर...

Anil Kadam

Sangli News : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सन 2024-25 चे 822 कोटी 99 लाख 12 हजारांचे व 29 लाख रूपये शिलकीचे मूळ अंदाजपत्रक प्रशासकीय महासभेत सादर केले. यामध्ये पदाधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात येणार्‍या फुगीर योजनांना यावर्षी मात्र कात्री लावली. सार्वजनिक आरोग्य, यंत्रशाळा, प्रभाग समित्या, ड्रेनेज, पाणीपुरवठ्यासह इतर खर्च 512 कोटी खर्च अपेक्षित धरला आहे. सध्या मनपाचे सभागृह नसल्याने आयुक्तांच अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणार आहेत. (Latest Marathi News)

महापालिकेत प्रशासनाच्यावतीने आयुक्त स्थायी-समितीकडे अंदाजपत्रक सादर करत होते. त्यानंतर स्थायी समितीच्या सभापतीकडून महापौरांना अंदाजपत्रक सादर केले जात होते. त्यानंतर महापौर अंतिम अंदाजपत्रक करत होते. मात्र यावेळी सभागृह अस्तित्वात नसल्याने आयुक्तांनी तयार केलेला प्रशासकीय अर्थसंकल्पच अंतिम असणार आहे. त्यानुसार महापालिकेची अर्थसंकल्पीय प्रशासकीय सभा गुरूवारी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आयक्त सुनील पवार यांनी सन 2023-24 चे सुधारीत व 2024-25 चे मूळ अंदाजपत्रक सभेत मांडले. यामध्ये कोणतीही करवाढ अथवा दरवाढ केलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय नागरिकांना खूष करण्यासाठी पदाधिकार्‍यांकडून योजना आखल्या जातात, त्या पूर्ण होत नाहीत. केवळ फुगीर अर्थसंकल्प (Budget) तयार करण्याचे काम केले जात होते. याला फाटा देत आयुक्तांनी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प तयार केला आहे. यामध्ये एलबीटी अनुदान, कर विभाग, मालमत्ता विभाग, शासकीय अनुदान, पाणीपुरवठा, घरपट्टी विभागातून 512 कोटी जमा दाखविली आहे. तर सामान्य प्रशासन, अग्निशमन विभागा, सार्वजनिक आरोग्य, यंत्रशाळा, प्रभाग समित्या, ड्रेनेज, पाणीपुरवठ्यासह इतर खर्च 512 कोटी खर्च अपेक्षित धरला आहे. अंदाजपत्रक तयार करताना शहर विकास, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण यावर भर देण्यात आला आहे.

वस्तुनिष्ठ, सुविधांवर भर देणारे अंदाजपत्रक : आयुक्त

महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना फुगीर योजना अथवा विकासकामे सूचविली गेली नाहीत. वस्तुनिष्ठ सार्वजनिक आरोग्य व शिक्षणावर भर दिला गेला आहे. शिवाय कोणतीही करवाढ अथवा दरवाढ यामध्ये करण्यात आलेली नाही. उत्पनवाढीसाठी लोकांवर बोजा पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. पर्यावरणावर देखील भर देऊन आर्थिक तरतूद केली असल्याचे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले. (Sangli News)

अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी -

* ड्रोनने मालमत्ता व वृक्षांची गणना; 7 कोटींची तरतूद

* आयुक्तांना विकासकामांसाठी दहा कोटी

* 56 एमएलडी जलशुध्दीकरणासाठी 2.65 कोटी

* मॉडेल स्मार्ट स्कूल योजनेसाठी 10 कोटी

* श्वान निर्बीजीकरणासाठी 2 कोटी

* शहर पर्यावरणाचा अहवालासाठी 10 लाख

* वारणाली हॉस्पिटलसाठी 1 कोटी 60 लाख

* कर्मचार्‍यांसाठी जीओ फेसिंगसाठी 25 लाख

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT