Solapur NCP : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता अजितदादांची साथ सोडणार

Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षामध्ये मी जन्मजातच आहे. काही राजकीय तडजोडींमुळे मधल्या काळात मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो होतो. मात्र, भाजपच्या विचारधारेशी मी एकनिष्ठ असल्याचे खुद्द उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले आहे.
Uttam Jankar-NCP
Uttam Jankar-NCPSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जानकर हे येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तसे संकेत त्यांनी स्वतः दिले आहेत. भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जानकर यांचे नाव चर्चिले जात आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये मी जन्मजातच आहे. काही राजकीय तडजोडींमुळे मधल्या काळात मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो होतो. मात्र, भाजपच्या विचारधारेशी मी एकनिष्ठ असल्याचे खुद्द उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी स्पष्ट केले आहे. जानकर यांच्या त्या विधानानंतर ते लवकरच अजित पवारांना (Ajit Pawar) सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uttam Jankar-NCP
Dada Bhuse Vs Sudhakar Badgujar : जिल्हाप्रमुख होताच बडगुजर ठरले दादा भुसेंचे तिसरे बळी? शिंदे अन् ठाकरे गटातील वाद टोकाला

सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी उत्तम जानकर हे इच्छुक आहेत. भाजपकडून (BJP) निवडणूक लढविण्याची तयारीही जानकर यांनी सुरू केली आहे. तशी चाचपणी सुरू केली आहे. त्यांच्याकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवातही करण्यात आली आहे.

उत्तम जानकर यांनी नुकतीच महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वोच्च नेत्याची भेट घेतली आहे. त्या नेत्याकडून हिरवा कंदिल मिळाल्याचा दावा जानकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उत्तम जानकर यांची उमेदवारी नक्की समजली जात आहे. त्यानंतर जानकर हे कामाला लागले आहेत.

Uttam Jankar-NCP
Parbhani Congress : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेत्यांचे मनोबल खचले...

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत जानकर यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. मात्र, मूळचे भारतीय जतना पक्षाचे जानकर हे राष्ट्रवादीत जास्त काळ रमले नाहीत.

दरम्यान, उत्तम जानकर यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध दर्शवला आहे. खुद्द माजी खासदार शरद बनसोडे यांनीही उपरा उमेदवार देण्यापेक्षा आम्ही आहेत ना. असे नुकतेच बनसोडे म्हटले आहे. तसेच, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जानकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला जात आहे, त्यामुळे हा प्रवेश चर्चेचा ठरला आहे.

Uttam Jankar-NCP
Thackeray Group News : घटनेच्या आठ वर्षांनंतर गुन्हा दाखल; उद्धव ठाकरेंचा बडगुजर यांना फोन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com