Thackeray Group Vs BJP : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Thackeray Group Vs BJP : ठाकरे गट भाजपाच्या विरोधात गावभर दिंडोरा पिटणार; सांगलीत 'होऊ दे चर्चा' रंगणार

Mangesh Mahale

राहुल गडकर

Sangli : सांगलीतील ठाकरे गट आता भाजपाविरोधात आक्रमक झाला असून, तो गावभर भाजपाच्या विरोधात दिंडोरा पिटणार आहे. भाजपाच्या फसव्या घोषणांच्या विरोधात रान उठवून गावोगावी जाऊन भांडाफोड करणार आहे. त्यासाठी ठाकरे गट तयारीला लागला आहे. ठाकरे गट "होऊ दे चर्चा' उपक्रम राबवणार आहे. त्याबाबतची माहिती ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख सागर पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

भाजप केवळ मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचे खोटे आश्वासन देत आहे, पण प्रत्यक्षात काही केले नाही. दुष्काळी भाग पाण्यासाठी व्याकूळ झाला असताना भाजपाने म्हैसाळ योजनेसाठी 100 कोटींची तरतूद केल्याचे पत्रक काढले. भाजपाकडून सांगली जिल्ह्यातील लोकांची फसवणूक सुरू असून, याचा भांडाफोड करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात 'होऊ दे चर्चा' हे अभियान राबविण्यात येणार आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ ते १२ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक गावात भाजपाच्या आश्वासनाची पोलखोल केली जाणार आहे. जनतेने भाजपाने दिलेल्या खोट्या आश्वासनाला बळी पड़ू नये, असे आवाहन केले आहे. अभियान राज्यभर राबविले जात आहे. त्यामुळे तालुक्यात हे अभियान जोमाने राबवू, असा निर्धार या वेळी करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT