Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : 2029 निवडणुकीत मोठा ट्विस्ट! महिला आरक्षणासह लोकसभा, विधानसभेच्या जागांत वाढ; चंद्रकांत पाटलांकडून राजकारणात बदलाचे संकेत

chandrakant patil Sangli bjp politics : २०२९ च्या निवडणुकीत तदार संघांची पुनर्रचना होणार आहे. या पुनर्रचनेत विधानसभेच्या २८८ ऐवजी सुमारे ३५० मतदारसंघ होतील असे सुतोवाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Aslam Shanedivan

  1. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे लोकसभा व विधानसभा जागा वाढण्याची शक्यता

  2. 2029 निवडणुकीत महिला आरक्षण लागू होण्याचे संकेत

  3. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्याचे आवाहन केले

Sangli Political News : मतदार संघ पुनर्रचनेत जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभेची प्रत्येकी एक जागा वाढण्याची शक्यता आहे. तर २०२९ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, कामाला लागावे असे सुतोवाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आज खरे सांस्कृतिक भवनमध्ये पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भगवानराव साळुंखे, संग्रामसिंह देशमुख, डॉ. रविंद्र आरळी, रावसाहेब पाटील, दीपक शिंदे, संदीप आवटी, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, शरद लाड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, मतदार संघांची पुनर्रचना होणार आहे. या पुनर्रचनेत विधानसभेच्या २८८ ऐवजी सुमारे ३५० मतदारसंघ तर लोकसभेच्या ५४४ ऐवजी ६५० खासदार होतील. मतदारसंघ पुनर्रचनेत जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ असतील, तर विधानसभेचे आठ ऐवजी नऊ मतदार संघ होतील.

कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पुनर्रचना, मतदार यादी पुनरीक्षण आणि महिला आरक्षण यावर बारकाईने काम करावे. बीएलओ घरी येतील त्यांना अर्ज भरून द्या. अन्यथा २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.

आमदार पडळकर म्हणाले, जिल्ह्यात वर्षानुवर्षे दोन ते तीन घराण्यांचीच सत्ता राहिली. आमदार, खासदार, मंत्रीपदे त्यांच्याच घरात गेले. मात्र २०१४ च्या निवडणुकीपासून सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना आमदार म्हणून संधी मिळाली. भाजपा संविधानावर चालणारा पक्ष आहे, येथे कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी स्वागत तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा सरचिटणीस विश्‍वजित पाटील यांनी आभार मानले.

जगात नंबर वनसाठी भाजपची सत्ता हवी

भारत जगात चौथ्या नंबरवर आहे, तो सन २०४७ पर्यंत जगात प्रथम क्रमांकावर असेल असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तोपर्यंत देशात, राज्यात भाजप सत्तेत हवा. गाव तालुका नगर जिल्हा राज्य आणि देश ठिकाणी भाजपची सत्ता हवी असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

जुन्या, निष्ठावंतांचा सत्कार

भाजपचे जुने, निष्ठावंत कार्यकर्ते ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, आप्पासाहेब काळेबाग, विनायक गोखले, डॉ. अशोक येडगे, शंकर इसापुरे, सातलिंग शिंदगी आणि सुनीता पाटणकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

FAQs :

1. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे काय?
मतदारसंघांच्या सीमा व जागांची संख्या बदलण्याची प्रक्रिया

2. किती जागा वाढण्याची शक्यता आहे?
लोकसभा व विधानसभा प्रत्येकी एक जागा वाढण्याची शक्यता आहे

3. महिला आरक्षण कधी लागू होईल?
2029 च्या निवडणुकीत लागू होण्याची शक्यता आहे

4. हे विधान कोणी केले आहे?
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे

5. कार्यकर्त्यांना काय संदेश देण्यात आला?
आगामी बदल लक्षात घेऊन कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT