Chandrakant Patil News: प्राध्यापक भरती कधी होणार? चंद्रकांतदादांनी सांगितली तारीख

University professor hiring Maharashtra News: राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालयांतील साडेपाच हजारांहून अधिक प्राध्यापक पदांसह मोठ्या प्रमाणावर भरतीची प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे
chandrakant patil Latest News
chandrakant patil Latest News sarkarnama
Published on
Updated on

मिनाक्षी गुरव

Pune News: प्राध्यापक भरतीला ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा विद्यापीठे, महाविद्यालयांच्या कामकाजाला फटका बसत आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीची मागणी राज्यातील पात्रताधारक उमेदवारांनी अनेकदा केली आहे, त्यासाठी आंदोलनेही होत आहेत.

राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा कधी भरल्या जाणार, या प्रश्न ऐरणीवर असताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा प्राध्यापक भरतीला नवीन तारीख सांगितली आहे.प्राध्यापक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, अर्ज दाखल झाले आहेत, छाननीही झाली आहे. आता मुलाखती आणि नियुक्तीचा टप्पा बाकी आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये ५, ५०० प्राध्यापक आणि २, ९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी दिली.

राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी साडेपाच हजार प्राध्यापकांची भरती मार्चअखेरीस पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सप्टेंबर २०२५ मध्ये देण्यात आले होते. मात्र, आता ही भरती प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, त्यासंदर्भात विद्यापीठांना सूचना दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांना दिली.

chandrakant patil Latest News
TET Exam News: लाखो शिक्षकांना TET परीक्षेतून दिलासा! नोकरीवरील टांगती तलवार कायमची दूर होणार; कुणाला मिळणार सूट

‘‘विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. गेल्या २०-२५ वर्षांतील ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापक, तसेच अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची पदे भरण्यासही मंजुरी दिली आहे," असे पाटील यांनी सांगितले.

chandrakant patil Latest News
Nashik Crime News: खरातनंतर नाशकात आणखी एक मोठं कांड, टॅबमध्ये आढळले 200 अश्लील VIDEO, मोठा व्यावसायिक जाळ्यात

या जागा भरल्यानंतर CHB प्राध्यापकांची फारशी आवश्यकता भासणार नाही.परंतु,पुढील काळात सीएसबी प्राध्यापकांच्या मानधनात 900 वरून 1,200 रुपयांपर्यंत वाढ केली जाईल, असे माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.

chandrakant patil Latest News
District Bank News: प्रस्थापित बड्या नेत्यांचे जिल्हा बँकेतील 'अकाउंट क्लोज'; नव्या कायद्याने दाखवला घरचा रस्ता

तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र 900 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत मानधन वाढ करण्यासंदर्भात पुढील काळात निर्णय घेतला जाईल. सुमारे 5 हजार 500 प्राध्यापकांची पदे भरल्यानंतर तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या पदांची फारशी आवश्यकता भासेल,असे वाटत नाही. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, असे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com