Sangli DCC Bank Election Result | Sanjay Patil Wins Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Bank Result : सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांना धक्के : सुमनताईंचा पराभव करत संजयकाकांची बाजी, अजित घोरपडेंचाही दणदणीत विजय

Sangli DCC Bank Election Result 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून १४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या सत्तेवर या दोन्ही पक्षांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या निकालानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता असून, अध्यक्षपदाच्या निवडीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Jagdish Patil

Sangli DCC Bank Election Result Update 2026 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजय काका पाटील यांनी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. अवघ्या एका मतांनी झालेल्या या विजयामुळे तासगावच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विजय मिळवला आहे. तासगाव सोसायटी गटातील निवडणुकीत संजय काका पाटील यांच्याविरोधात दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि माजी आमदार सुमनताई पाटील मैदानात होत्या. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

मतमोजणीत संजय पाटील यांना ३९ मते मिळाली, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. अवघ्या दोन मतांच्या फरकाने संजय काका पाटील यांनी बाजी मारली. हा निकाल सुमनताई पाटील यांच्यासह आमदार रोहित पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

दरम्यान, कवठेमहांकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विजय मिळवला. त्यांना ३७ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी टी. व्ही. पाटील यांना ३४ मते मिळाली. त्यामुळे या गटातही घोरपडे यांनी तीन मतांच्या फरकाने विजय मिळवला.

सांगली जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून १४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या सत्तेवर या दोन्ही पक्षांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या निकालानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता असून, अध्यक्षपदाच्या निवडीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT