Sangli Bank Result: गोपीचंद पडळकर सर्वांना पुरून उरले : सांगली जिल्हा बँकेचं मैदान मारलं, 20 मतांनी विजयी

Sangli DCC Bank Election Result 2026 : जत सोसायटी गटातील गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचा विषय चांगलाच चर्चेत आला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात गेले होते. उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज अवैध ठरवल्यानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
Sangli Bank Election | Gopichand Padalkar Victory
Sangli Bank Election | Gopichand Padalkar VictorySarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाजी मारली आहे. जत सोसायटी गटातून पडळकर यांनी विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव करत संचालकपदावर विजय मिळवला. पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर विनोद पवार यांना ३४ मते मिळाली.

दुसरीकडे, तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजय पाटील यांनीही विजय मिळवला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या विजयाची चर्चा सुरू झाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (३ नोव्हेंबर) मतमोजणी सुरू आहे.

मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

Sangli Bank Election | Gopichand Padalkar Victory
Gokul Chairman Election : सतेज पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीचा मास्टर प्लॅन; मंत्रिमंडळाच्या बैठकीत आजच 'तो' वटहुकूम निघणार?

जत सोसायटी गटातील गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचा विषय चांगलाच चर्चेत आला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात गेले होते. उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज अवैध ठरवल्यानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Sangli Bank Election | Gopichand Padalkar Victory
Aaishvary Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची मोठी फसवणूक : मोबाईलवर मेसेज आला अन् थेट परदेशातून...

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या न्यायालयीन लढाईमुळे पडळकर यांच्या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली होती. अखेर न्यायालयीन लढाईनंतर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या पडळकर यांनी २० मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आता त्यांच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

कारण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बहुतांश जागा बिनविरोध झाल्याने सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, जत सोसायटी गटातील निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरली होती. या गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर निवडणूक रिंगणात उतरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला होता. पडळकर यांना जिल्हा बँकेत प्रवेश मिळू नये, यासाठी जयंत पाटील यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरणार की पडळकर ही खेळी मोडून काढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, आता अखेर पडळकर यांनी तब्बल २० मतांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.