Kolhapur: सांगली लोकसभा मतदारसंघातील (Sangli Lok Sabha Constituency 2024) गुंता दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे, अशातच आज काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
सांगलीबाबत मी कार्यकर्त्यांची भूमिका मांडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अनादर करण्याची भूमिका आमची नाही. महाविकास आघाडीकडून जो काही निर्णय घेतला जाईल त्याचे मी भविष्यात पालन करेन. मात्र, सांगलीच्या जागेसाठी माझा हट्ट आणि आग्रह आहे. त्याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी तातडीने निर्णय जाहीर करावा, असा इशारा विश्वजित कदम यांनी दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना आमदार विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आम्हाला सर्वांनाच आदर आहे. ज्या संघर्षातून ते लढाई लढत आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आणखी वाढला आहे. पण सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी मांडत आहे. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पतंगराव कदम यांनी हा बालेकिल्ला मजबूत ठेवला. एकेकाळी नऊपैकी सहा आमदार काँग्रेसचे चिन्ह घेऊन निवडून आले आहेत. त्यामुळे आजही काँग्रेसला वातावरण चांगले आहे. कार्यकर्त्यांच्या भावना मांडत आहे, मात्र उद्धव ठाकरे यांचा अनादर करत नाही, असे स्पष्टीकरण विश्वजित कदम यांनी दिले.
उद्धव ठाकरे यांनाच आमची विनंती आहे. काँग्रेस पक्षासोबत चर्चा करावी, यातून तातडीने मार्ग आणि मध्य भूमिका काढावी. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, महाविकास आघाडीतील घटक पक्षातील आमदार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून मला जो आदेश येईल तो मी पाळीन. जो काही आघाडी धर्म असेल तो मी भविष्यात पाळीन. मात्र, आज ही जागा काँग्रेसलाच मिळावी. उद्धव ठाकरे यांना विनंतीपूर्वक आणि आदरपूर्वक विनंती करीन. ही जागा काँग्रेसला मिळवण्यासाठी माझा हट्ट आणि आग्रह आहे, अशी भूमिका जाहीर करत विश्वजित कदम यांनी कुठे तर यातून मार्ग काढावा आणि जो काही निर्णय असेल तो तातडीने जाहीर करावा, अशी मागणी केली.
या संपूर्ण प्रकरणामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील अस्वस्थता आहे. त्याला केवळ एक महिनाभर शिल्लक आहे. या भूमिकेतून मी आज पत्र लिहिले आहे. मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस म्हणून हे एक आमचा प्रस्ताव आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी मांडल्या आहेत. जर ते शक्य असेल तर त्याचा विचार करावा. सोबत महाविकास आघाडीतील वरिष्ठांनी निर्णय घ्यावा. जोपर्यंत सांगलीच्या जागेवर निर्णय होत नाही तोपर्यंत माझी भूमिका ठाम आहे, असे सांगत ज्याला सांगली जिल्ह्यातील इतिहास भूगोल माहिती आहे, त्याला झारीच्या शुक्राचार्याबद्दल माहिती आहे. लवकरच एआयचा वापर करून त्याचा शोध घेतला जाईल.आम्हीच वर्तमान आणि भविष्यकाळातील काँग्रेसचे राजकारण युवा वर्ग म्हणून ठरवू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.