महाविकास आघाडीकडून सांगलीत (Sangli Lok Sabha Constituency 2024) चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
चंद्रहार पाटलांच्या प्रचारात आघाडीतील काँग्रेसचे नेते सक्रीय नसल्याचे बोलले जाते. यावरुन ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) काँग्रेसच्या नेत्यांना सुनावलं आहे. काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांचे कौतुक करीत राऊतांनी त्यांनी चिमटा काढला आहे.
राऊत म्हणाले, "सांगलीमध्ये तिरंगी लढत आहे, तिरंगी लढत करण्यामागे कुणाचे डावपेच हे नंतर कळेल. एक भाजपचा अधिकृत उमेदवार, एक अनधिकृत उमेदवार आहे. भाजप नेत्याचा फौंजफाटा सांगलीत येत आहे. काही नेते काकासाठी, काहीजण दादासाठी येत आहेत. वसंतदादा पाटील हे वाघ होते, बाळसाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे हेही वाघ आहेत. जयंत पाटील हेही वाघ आहेत. हे वाघ आपण जपले पाहिजे,"
"विश्वजीत कदमांनी स्वतःला वाघ सिद्ध करायचे असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांनी विजयी केले पाहिजे. विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे चार जूनला कळेल. चार जूननंतर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू, असा टोला राऊतांनी कदमांना लगावला.
‘शिवसेना ही सर्टिफाइड वाघ आहे. आमचे बोधचिन्हच वाघ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ते चितारलेले आहे’, असेही राऊत म्हणाले. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावरील कारवाईबाबत राऊत यांनी माहिती दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याबाबत राहुल गांधींशी चर्चा केली आहे. सांगलीत तिरंगी लढत आहे, दोन्ही उमेदवारांना भाजपकडून रसद पुरवली जात आहे, असा आरोप राऊतांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावले आहे, "माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचे काम करा,अन्यथा माझा तुम्हाला शेवटचा रामराम असेल," अशा शब्दात जयंतरावांनी सज्जड दम दिला आहे.
विश्वजीत कदम यांना जयंत पाटील यांनी सुनावले आहे. "स्टेजवर एक आणि खाली एक भाषा करू नका, नाही तर पंचायत होईल," अशा शब्दात जयंत पाटलांनी विश्वजीत कदम यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.