Sangli Lok Sabha Election
Sangli Lok Sabha Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha Election 2024 Result: शतरंज के खिलाडी - सांगलीच्या बुद्धीबळपटावर विशाल पाटलांचा ताबा

Anil Kadam

Sangli News: सांगली लोकसभा मतदारसंघाची (Sangli Lok Sabha Election 2024) मतमोजणी सुरू पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी 16 हजार 561 मतांची आघाडी घेतली आहे.

पहिल्या दोन्ही घरामध्ये भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन फेऱ्यात भाजप पिछाडीवर गेल्याने पुढील फेऱ्यांमध्ये लीड वाढणार का याकडे लक्ष लागले आहे. अपक्ष विशाल पाटील पहिल्यातील फेरीत आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

सांगली-मिरज रोड वरील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व निवडणूक निरीक्षक बी. परमेश्वरम यांनी मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर पोस्टल मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटची कडक बंदोबस्तात मोजणी सुरू झाली.

मतमोजणी ला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सुमारे सात हजार तर दुसऱ्या दुसऱ्या फेरीत 13 हजार 806 मताने तर तिसऱ्या फेरी अखेर 16 हजार 561 मतांनी आघाडी घेतली आहे.

भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील हे पहिल्या तीन फेरीमध्ये पिछाडीवर राहिले. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात असून पुढील फेऱ्यांमध्ये खासदार पाटील हे मताधिक्य घेणार का याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात आली नाही. पहिल्या तीन फेऱ्यात विशाल पाटील आघाडीवर असल्याने त्यांच्या कार्यकर्त्याकडून जल्लोष सुरू केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT