Maharashtra Lok Sabha 2024 Results Live: महाराष्ट्रात विरोधकांना संपवायल्या निघालेल्या भाजपला धक्का बसणार?

Lok Sabha Election 2024 Results Live Updates : महाराष्ट्रात विरोधकांचे राजकारण संपवायला निघालेल्या भाजपला लोकसभेच्या 48 पैकी 24-25 जागा मिळत असल्याचे चित्र मतमोजणीच्या पहिल्या तासात दिसून आले.
Lok Sabha Election 2024 Voting LIVE
Lok Sabha Election 2024 Voting LIVESarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 News : लोकसभा निवडणुकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात टोकाची सत्तास्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मतमोजणीच्या पहिल्या तासात महायुती आणि महाविकास आघाडीला समान जागा मिळत असल्याचे चित्र दिसत होते. पहिल्या तासात चित्र फारसे स्पष्ट होत नसले तरी आघाडी आणि पिछाडीच्या बातम्यांमुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धडधड वाढली होती.

विरोधकांचे राजकारण संपवायला निघालेल्या भाजपला या निवडणुकीत मतदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पहिल्या तासात दिसून आले. महायुतीला 24-25 जागांवर आघाडी मिळाली होती. भाजपने मिशन ४५ आखले होते.

म्हणजे त्यांना महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंक्याच्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडूनही भाजपचे हे मिशन पूर्णत्वास जाणार नाही, असे चित्र सुरवातीच्या कलांमध्ये दिसून आले. बहुतांश एक्झिट पोलनीही असेच अंदाज वर्तवले होते.

मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी स्पर्धा आहे. मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार चार मतदारसंघांत तर महायुतीचे उमेदवार दोन मतदारसंघांत आघाडीवर होते. मुंबईत उद्धव ठाकरे यांचाच बोलबाला दिसून आला.

विदर्भात चार ठिकाणी महाविकास आघाडीला बळ मिळत असल्याचे चित्र होते. मराठवाड्यात उद्धव ठाकरेंचीच जादू चालत असल्याचे दिसून आले. पश्चिम महाराष्ट्रात तीन जागांवार महाविकास आघाडी पुढे होती. बारामती सुरवातीला सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. त्यानंतर सुनेत्राताई पवार यांनी आघाडी घेतली. बारामती मतदारसंघाकडे साऱ्या देशाचे ल क्ष लागून राहिले आहे.

छत्रपती संभाजीनरमधून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर होते तर शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि खासदार इम्तियाज जलील पिछाडीवर होते. बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे पिछाडीवर आहेत.

जालना मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे, नांदेड मतदारसंघात प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर होते. उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत झाली. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर होते.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE
Nashik Lok Sabha 2024 Results LIVE: हेमंत गोडसे आघाडीवर, पण वाजेची भिस्त सिन्नरकरांवरच

कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे छत्रपती शाहू महाराज, हातकणंगले मधून शिवसेनेचे सत्यजित पाटील आघाडीवर होते. माढ्यातून आघाडीचे धैयशील मोहिते पाटीलआघाडीवर होते. सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे दिसत आहे.

भाजपने गेल्या पाच वर्षांत विरोधकांचे राजकारण संपवण्याचे शक्य तितके प्रयत्न केले, मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळेल का, अशी शंका पहिल्या तासातील कलांवरून निर्माण होत आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकहाती झुंज देणारे ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे महायुतीच्या दिग्गजांना मात देणार, असे चित्र पहिल्या तासात दिसले. भाजपचे आमदार राणाजगजितिसंह पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघातूनही ओमराजे यांना आघाडी होता. यासह शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार असलेले ज्ञानराज चौगुले, पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या भूम-परंड्यातूनही ओमराजेंना आघाडी होती.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com