Sangli Mahanagpalika  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Mahapalika : सांगलीच्या जिल्हाध्यक्षांचा थेट भाजप-शिवसेनेला 'अल्टिमेटम'; म्हणाले: "30 जागा द्या, नाहीतर...!"

Sangli Mahapalika political twist as the NCP district president : सांगली महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेगळे वळण; जिल्हाध्यक्षांनी भाजप-शिवसेनेला ३० जागांचा थेट अल्टिमेटम दिला. महाराष्ट्रातील ताज्या राजकीय बातम्या जाणून घ्या.

Rahul Gadkar

सांगली महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून होत असलेला दबाव आणि शिवसेनेकडून वाढत असलेली ताकद त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कुचंबणा होताना दिसत आहे. अशातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली महानगरपालिकेत केलेली जागा वाटपातील मागणी त्यामुळे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा आता संयम सुटला आहे. सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमधून किमान तीस जागा मिळाव्यात अन्यथा स्वबळावर लढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी भाजप, शिवसेनेला दिला आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी नगरपालिका एकत्र आल्यावर भाष्य केले होते. तो धागा पकडत जगदाळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रा. जगदाळे म्हणाले, "महायुती एकत्र लढेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. आमचीही तीच भूमिका आहे. जिथे पक्षाची ताकद, तिथे त्या-त्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे, हेच जागावाटपाचे सूत्र हवे. जिंकण्याची क्षमता असलेले अनेक उमेदवार आमच्याकडेच आहेत. २००३ मध्ये घड्याळ चिन्हावर महापालिकेत पहिल्यांदा सत्तापरिवर्तन झाले. २००८ मध्येही राष्ट्रवादीच्या पुढाकाराने महाआघाडी सत्तेत आली. २०१३ नंतर अडीच वर्षे राष्ट्रवादीचा महापौर झाला. असा दाखला जगदाळे यांनी दिला.

मावळत्या सभागृहात पक्षाचे १५ नगरसेवक होते. यावर आधारित तीस जागांवर लढण्यासाठी सक्षम आहोत. मिरजेत ५, ६, २०, ३ व ७ या प्रभागांतील किमान १८ जागांसाठी आग्रही आहोत. सांगलीत ११ जागा आणि कुपवाडमधील काही प्रभागांत आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या विशेष निधीमुळे आमच्या सर्व उमेदवारांच्या प्रभागात वातावरण अनुकूल आहे. काँग्रेससह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही काहींचा पक्षप्रवेश येत्या काळात आमच्याकडे होईल. त्यामुळे महायुती आणखी मजबूत होईल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT