Sangli Market Committee Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Market Committee : बाजार समित्या बंद! केंद्र सरकारविरोधात काँग्रेस - राष्ट्रवादी आक्रमक

Congress - NCP Aggressive : संचालक मंडळांनी एकत्रित येत विधेयकाची होळी करीत निदर्शने केली. तातडीने हा कायदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी सभापती सुजय शिंदे यांनी केली.

Anil Kadam

Sangli : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याविरोधात सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक झाले. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील सात बाजार समित्यांनी एक दिवस बंद पुकारला. बाजार समित्या कार्यक्षेत्रातील सौदे बंद ठेवल्याने शंभर कोटींची उलाढाल ठप्प झाली. बाजार समित्यांच्या संचालकांनी एकत्रित येत केंद्र सरकारचा निषेध केला.

केंद्र सरकार (Central Government) शेतकर्‍यांविरोधात भूमिका घेत असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियमनामध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समिती व त्यांचे इतर दुय्यम उपबाजार आवारात बंद ठेवण्यात आला. या बंदमध्ये सहभागी होत सांगली (Sangli) कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य वसंतदादा मार्केट यार्डसह जत, कवठेमहांकाळ, मिरज, फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारातील व्यवहार बंद ठेवले.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सर्व संचालक मंडळांनी एकत्रित येत केंद्र सरकारच्या विधेयकाची होळी करीत निदर्शने केली. केंद्र सरकारने तातडीने हे विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. या कायद्यामध्ये बदल करावा, तसेच या कायद्याच्या विरोधात बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटना, हमाल तोलाईदार यांच्या संघटनांनी पाठिंबा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी काँग्रेसचे नेते विशाल पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक आनंदराव नलवडे, बसवराज बिराजदार, शशिकांत नागे, सचिव महेश चव्हाण उपस्थित होते.

शेतकर्‍यांना बाधा आणू नका : सुजय शिंदे

सरकारकडून शेतकर्‍यांना बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुलमी कायदा आणून शासनाला करायचे काय आहे, असा प्रश्न आहे. त्यामुळे तातडीने हा कायदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केली.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT