Angry farmer : ...संतप्त शेतकऱ्याने थेट कृषी उत्पन्न बाजार समिती समोरच काढलं पिस्तूल अन् कोयता!

Agricultural Produce Market Committee Khamgaon : शेतकऱ्याच्या या आंदोलनामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.
Angry farmer
Angry farmerSarakarnama
Published on
Updated on

Buldana News : शेतमालाला योग्य हमीभाव न मिळाल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच बुलढाणा येथील एका शेतकाऱ्याने संतप्त होत हातात कोयता आणि पिस्तूल घेत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने केली.

शेतकऱ्याच्या या आंदोलनामुळे परिसरात काहीसा गोंधळ बघायला मिळाला. सोयाबीनला प्रती क्विंटल ६ हजार रुपये दर मिळावे, अशी या शेतकऱ्याची मागणी होती. मात्र योग्य बाजारभाव मिळत नसल्याच्या रागातून त्याने रस्त्यावर सोयाबीन फेकून देत निदर्शने केली.

राज्यात नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहण्यात येते. मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकांची लागवड करतात. यावर्षी महाराष्ट्रात 50 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी सुरुवातीलाच पाऊस एक महिना उशिराने आला. दरम्यान, पावसाचा लहरीपणा पाहायला मिळाला. त्यामुळे, याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनच्या वाढीवर झाला. अनेक ठिकाणचे सोयाबीनची झाडं वाढलीच नव्हती, त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Angry farmer
Girish Mahajan Vs Jitendra Awhad : 'जितेंद्र आव्हाडांची 'DNA' टेस्ट करा' ; मंत्री गिरीश महाजनांची मागणी!

अनेकांनी आपल्याकडे असलेल्या पाणीसाठ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा विशेष परिणाम सोयाबीनच्या पिकावर झाला नाही. यात कमी म्हणून की काय त्यानंतर येलो मोझॅक नावाचा बुरशीजन्य रोग सोयाबीनवर पडला. त्यामुळे सुद्धा सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. त्यामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन निम्म्याने घटल्याचं शेतकरी सांगत आहेत. हात तोंडाशी आलेले पीक हिरावून गेला असतांना आता उर्वरित शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या अशाच एका शेतकाऱ्याने आज सोयाबीनला भाव मिळत नसल्याच्या रागातून हातात कोयता आणि देशी पिस्तूल घेत खामगाव(Khamgaon ) कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शनं करत आपला राग व्यक्त केला आहे.

रवी महानकार असं या शेतकऱ्यांचं नाव असून हा शेतकरी अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा या गावचा रहिवासी आहे. या शेतकऱ्याने आतापर्यंत 100क्विंटल सोयाबीन(soybeans) विकल्याच म्हटल आहे. मात्र मिळालेला मोबदला हा अतिशय कमी असून आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीनला प्रती क्विंटल 6 हजार रुपये दर मिळावा. अशी या शेतकऱ्याची मागणी आहे.

Angry farmer
Girish Mahajan Vs Jitendra Awhad : 'जितेंद्र आव्हाडांची 'DNA' टेस्ट करा' ; मंत्री गिरीश महाजनांची मागणी!

तसेच, आज शेतकऱ्यांवर(farmer) अन्याय होत असून मी माझ्या सोबत आणलेली सोयाबीन रस्त्यावर फेकून या सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यासाठी मी आज हातात शस्त्र उचलले असल्याचा सोयाबीन उत्पादक शेतकरी रवी महानकर यांनी म्हटले आहे.. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. सध्या रवी महानकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com