सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 586 रिक्त पदांसाठी मेगाभरती सुरू असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला.
महानगरपालिका प्रशासनाने हा मजकूर तथ्यहीन आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले.
सध्या कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
sangli News : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये ५८६ रिक्त जागांसाठी ‘मेगाभरती’ सुरू आहे. याप्रकारची माहिती सोशल मीडिया आणि संकेतस्थळावर व्हायरल होत आहे. यावर ‘कोणतीही भरती प्रक्रिया सुरु नाही. तो मजकूर तथ्यहीन आणि दिशाभूल करणारा आहे.’ असे स्पष्टीकरण महानगरपालिका प्रशासनाने दिले आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील ५८६ पदांसाठी भरती होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने खालील बाबी स्पष्ट केल्या आहेत. महानगरपालिकेकडून सध्या कोणतीही सरळ सेवांची नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येत नाही.
महापालिकेची कोणतीही भरती प्रक्रिया ही शासन निर्णयानुसार वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणारी अधिकृत जाहिरात आणि महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या नोटीसनुसारच राबविली जाते. नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा ‘फेक न्यूज’वर विश्वास ठेवू नये.
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी कोणतेही संशयास्पद किंवा सोशल मीडियावरील लिंक्सवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. भरतीबाबतच्या अधिकृत माहितीसाठी महानगरपालिका कार्यालयाशी किंवा संकेतस्थळाशी संपर्क साधा. महानगरपालिकेच्या नावाने पसरवल्या जाणाऱ्या या खोट्या जाहिरातींची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
नागरिकांनीही अफवांना बळी पडू नये. जर भविष्यात भरती प्रक्रिया राबवण्यात आली, तर त्याची रितसर माहिती मुख्य प्रवाहात असलेल्या वर्तमानपत्रांमधून आणि अधिकृत माध्यमांतून दिली जाईल. नागरिकांनी आणि उमेदवारांनी अशा अफवा पसरवणारे मेसेज पुढे फॉरवर्ड करू नयेत. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबतही प्रशासन विचार करत आहे. असे कळविले आहे.
1. सांगली महापालिकेत 586 जागांची भरती सुरू आहे का?
नाही, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही.
2. व्हायरल झालेली जाहिरात खरी आहे का?
नाही, ती माहिती तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी असल्याचे सांगण्यात आले आहे.
3. प्रशासनाने काय स्पष्टीकरण दिले?
कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
4. नोकरी शोधणाऱ्यांनी काय करावे?
अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती तपासावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
5. भविष्यात भरतीची माहिती कुठे मिळेल?
महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अधिकृत जाहिरातीतूनच माहिती दिली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.