Sangli Mahapalika : सांगली महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमतापासून 1 जागा लांब रहावे लागले आहे. भाजपला 39 जागांवर यश मिळाले आहे. तर काँग्रेसला 18, राष्ट्रवादी काँग्रेसला 16, शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे आता भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पहिल्यांदा महापालिकेत प्रवेश मिळवलेल्या शिवसेनेला सोबत घ्यावे लागणार आहे. यासाठी चंद्रकांत पाटील कामाला लागले असून त्यांनी आमदार सुहास बाबर यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणुकीत महायुतीचा घोळ शेवटपर्यंत सुटला नाही. अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. अगदी दोन दिवसांत शिवसेनेने 63 उमेदवार आणि 3 पुरस्कृत उमेदवार रिंगणात उतरवले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाराजांना जसा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आधार मिळाला तसेच भाजप नाराजांना शिवसेना ऐनवेळचे आश्रयाचे घर ठरले. इतिहासात शिवेसेनेचे पहिल्यांदाच ६३ उमेदवार रिंगणात दिसले आणि त्यातही दोन उमेदवार जिंकलेही.
मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार सुहास बाबर यांनी ऐनवेळी हॉटेलमध्ये सर्वांना बोलवून धडाधड एबी फॉर्म वाटले. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गावभागातून युवराज बावडेकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांनी शिवसेनेतून उमेदवारी मिळवली. चारही उमेदवारांना घेऊन स्वतः बावडेकर मैदानात उतरले. भाजपने मोठी ताकद या प्रभागात लावली. आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पवार यांनी या प्रभागात तळ ठोकला होता.
अखेर बावडेकरांनी गावभागातून भगवा फडकवलाच. तर मिरजेतून आमदार सुरेश खाडे यांनी प्रभाग तीनमधून सुनीता व्हनमाने यांना उमेदवारी दिली. त्या विरोधात शिवसेनेतून सागर वनखंडे यांनी लढत दिली. यात सागर यांनी बाजी मारली. शिवसेनेचे दोन उमेदवार प्रथमच यानिमित्ताने पालिकेत जाणार आहे. आमदार सुहास बाबर यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सत्तेसोबत असून असे सांगत भाजपसोबत जायचा निर्णयाचे सुतोवाच केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.