Sangli Corporation : जयश्रीताई, पृथ्वीराज पाटलांना सोबत घेऊनही सांगलीत भाजप तोट्यातच; विरोधकांनी आणले जेरीस

Jayshreetai Patil-Prithviraj Patil News : सांगली आणि सांगलीवाडीतील निवडणुकीत भाजपला २०, तर विरोधकांना २३ जागा मिळाल्या. काँग्रेसने जागा टिकवल्या असून भाजपला मागील निवडणुकीपेक्षा दोन जागांचा फटका बसला आहे.
Jayshree Patil-Prithviraj Patil
Jayshree Patil-Prithviraj Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli, 17 January : सांगली आणि सांगलीवाडीत असलेल्या ११ प्रभागांतील ४३ जागांमध्ये भाजपला २०, तर विरोधकांना २३ जागा मिळाल्या आहेत. यात काँग्रेसने जागा राखण्यात यश मिळवले आहे, तर भाजपला गेल्या वेळच्या जागांत दोन जागांचा फटका बसला आहे. प्रभाग १९ व १७ मध्ये प्रत्येकी दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्याची भरपाई करताना नऊमध्ये चारही जागा जिंकल्या.

महापालिकेच्या २० पैकी ११ प्रभाग सांगलीत (Sangli) आहेत. तीन प्रभाग सांगलीवाडीत आहेत. गेल्यावेळी २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग ९, १०, ११, १५ आणि १६ मध्ये काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या इराद्याने काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना प्रवेश दिला. श्रीमती पाटील यांचे पाच, तर पृथ्वीराज पाटील यांचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. काही कमी फरकाने पराभूत झाले आहेत.

प्रभाग ९, ११, १४, १६, १३, १९ लक्षवेधी ठरलेत. प्रभाग १६ मध्ये श्रीमती पाटील यांचे कट्टर समर्थक उत्तम साखळकर यांचा पराभव धक्कादायक आहे. अंतर्गत गटबाजी, नाराजीचा त्यांना फटका बसल्याची चर्चा आहे. प्रभाग नऊमध्ये अपेक्षेप्रमाणे जयश्री पाटील (Jayshree Patil) समर्थकांचे पॅनेल आले. गतवेळी काँग्रेसचे पॅनेल होते. प्रभाग १२ मध्येही भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. प्रभाग दहामध्ये भाजपने तीन जागा जिंकल्या. काँग्रेसच्या माजी नगरसेवक वर्षा निंबाळकर पुन्हा विजयी झाल्या आहेत.

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या प्रभाग १५ मध्ये खासदार विशाल पाटील यांनी करिष्मा दाखवून देत पुतण्या हर्षवर्धन पाटील यांच्यासह पॅनेल निवडून आणत एकेकाळचे शिलेदार मनोज सरगर यांच्यासह भाजप (BJP) पॅनेलला जागा दाखवून दिली. गतवेळी काँग्रेसकडून विजयी झालेले उमेदवार यंदा भाजपकडून उभे होते. मनोज सरगर यांच्या आक्रमकपणाने येथे चुरस निर्माण झाली. मतदारांनी आक्रमकपणाला दूर सारून संदेश दिल्याचे मानले जात आहे.

Jayshree Patil-Prithviraj Patil
Corporation Election 2026 : आंबेगावच्या दोन कन्या अन्‌ एका सुपुत्राने नवी मुंबई, पुण्यात फडकावली विजयी पताका

प्रभाग १४ मध्ये पृथ्वीराज पवार यांचे जवळचे समर्थक विजय साळुंखे यांचा पराभवही धक्का देणारा ठरला. हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तो खरा ठरवत भाजपने तीन जागा जिंकल्या आहेत. साळुंखेंचा पराभव करून मतदारांनी नेत्यांना इशाराच दिल्याचे मानले जाते. प्रभाग १५ मध्ये काँग्रेसने चारही जागा जिंकून याहीवेळी दबदबा कायम ठेवला आहे. मंगेश चव्हाण, फिरोज पठाण यांना यावेळीही कौल मिळाला. त्यांनी भाजपची मात्रा चालू दिली नाही. राष्ट्रवादीचेही पॅनेल होते. मात्र तिरंगी लढतीतही काँग्रेसने बाजी मारली.

प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला. गतवेळी भाजपच्या तीन जागा होत्या. यंदा केवळ लक्ष्मण नवलाई विजयी झाले. दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह तीन उमेदवार आल्याने राष्ट्रवादीची (अजित पवार) ताकद वाढली आहे. प्रभाग १८ मध्ये भाजपने दोन, राष्ट्रवादीने दोन जागा मिळवल्या. येथे चारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा येतील, असा अंदाज होता. तो भाजपने फोल ठरवला.

Jayshree Patil-Prithviraj Patil
Nashik NMC Election : जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंना भाजपने बालेकिल्ल्यातच चारली धूळ, सुनेचाही पराभव

लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग १९ मध्ये भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्याही माजी नगरसेवकांच्या. दोन्ही उमेदवार निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांचे समर्थक होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन जागा जिंकून भाजपला धक्का दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com