Sangli politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News: राजकीय वारसदारांमध्ये संघर्ष? प्रभाग 3 ठरतोय हॉटस्पॉट; आमदार-पीए सुपुत्रांमध्ये निवडणुकीपूर्वीच लढत सुरु

Sangli Municipal Election:आमदार सुरेश खाडे यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक मोहन वनखंडे यांच्या राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेतील प्रभाग तीन हा पुन्हा एकदा या दोन गटातमधील संघर्षाचे कारण ठरणार आहे.

Rahul Gadkar

Sangli News: विधानसभा निवडणुकीतील संघर्षानंतर सांगली,मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा माजी मंत्री, आमदार सुरेश खाडे आणि शिवसेनेचे मोहन वनखंडे यांच्या गटातील संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत.

सध्या सांगली महानगरपालिका महायुती म्हणून एकत्र लढणार असे चित्र असले तरी मागील राजकीय संघर्ष पाहता, मिरज प्रभाग 3 मधून हे दोघे राजकीय विरोधकांचे वारसदार रिंगणात उतरणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आतापासून प्रभाग 3 हा सांगली महापालिकेतील राजकीय हॉटस्पॉट बनला आहे.

मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक मोहन वनखंडे यांच्या राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेतील प्रभाग तीन हा पुन्हा एकदा या दोन गटातमधील संघर्षाचे कारण ठरणार आहे. सांगली जिल्ह्याचे माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांचे पुत्र सुशांत खाडे हे प्रभाग क्रमांक तीन मधून चर्चेत आले आहेत.

भाजपमधून उमेदवारी घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहेत. आमदार सुरेश खाडे यांचे राजकीय वारसदार म्हणून सुशांत खाडे यांच्याकडे पाहिले जाते. प्रभाग क्रमांक तीन मधील अ हा गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने खाडे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. तशी भाजप कार्यालयात त्यांनी उमेदवारी मागणी अर्ज करत मुलाखात देखील दिली आहे.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांचे पुत्र देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक तीनमधून सागर वनखंडे देखील इच्छुक आहेत. सांगली महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याची शक्यता आहे. स्थानिक संदर्भ लक्षात घेता युती होईल का नाही याची शाश्वता नाही. भाजप आणि शिंदेगटयुतीची शक्यता कमी असल्याने या ठिकाणी लढत लक्षवेधी होणार आहे. आमदार सुरेश खाडे व त्यांचे एकेकाळचे निकटवतीय मोहन वनखंडे या दोघांत राजकीय वैमनस्य आहे.

सांगली महापालिकेची निवडणूक एकत्र लढल्यास जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांकडून यावर मध्य मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात खाडे यांचे सुपुत्र सुशांत खाडे यांनी सागर वनखंडे यांना नगरसेवक होऊ देणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणहून भाजपकडून दुसऱ्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT