Pune MNS: पुण्यात मनसेचा 2012चा फॉर्मुला; ठाकरे सेनेसोबत युती झाल्यास माजी नगरसेवकांना संधी

PMC election 2025 MNS Thackeray Sena alliance:2012 च्या निवडणुकांमध्ये मनसेने मोठं घवघवीत यश पुणे महापालिकेत मिळवलं होतं. मनसेचे तब्बल 29 उमेदवारांनी विजय मिळवला होता. मनसे हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला
MNS and Pune municipal election
MNS and Pune municipal electionsarkarnama
Published on
Updated on

Pune MNS News : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष आपली रणनीती अंतिम करताना दिसत आहे. पुण्यामध्ये मनसेने देखील आपली रणनीती आखली असून त्यानुसार 2012 च्या फॉर्मुल्यानुसार आगामी पालिका निवडणुकींना सामोरे जाण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला असल्याचे सांगितलं जात आहे.

यंदा निवडणुकीत मनसे ही महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. सध्या मनसेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत निवडणुकी संदर्भात अनौपचारिक बैठका सुरू झाल्या आहेत. पहिली बैठक शिवसेनेच्या कार्यालयात झाल्यानंतर आता दुसरी बैठक आज मनसे कार्यालयात होणार आहे.

एकीकडे ठाकरेंच्या सेनेसोबत निवडणुकी संदर्भात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यातील महाविकास आघाडीचे सर्व पक्ष मनसेला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानुसार आता मनसेने ठाकरे सेनेसोबत निवडणूक लढणे निश्चित झाल्यास किती जागा लढवायच्या आणि महाविकास आघाडी झाल्यास किती जागांवर दावा करायचा याबाबतचे समीकरण निश्चित केले आहे.

त्यानुसार मनसे पुण्यात ४० जागांवर लढण्याची तयारी करत आहे. या जागा मनसेला अनुकूल असल्याचे पक्षाने घेतलेल्या आढावा बैठकांमधून निश्चित केले आहे. या जगात निश्चित करताना पक्षाने 2012 चा फॉर्मुल वापरला असल्याचं सांगितलं जात आहे.ज्या जागां २०१२ मध्ये जिंकल्या होत्या त्या जागा यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसे पुन्हा एकदा लढणार आहे. तसेच या ठिकाणी माजी नगरसेवकांना पक्षाकडून संधी देण्यात येणार आहे. जर काही ठिकाणी मनसेचे माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले असल्यास त्या ठिकाणी आणि इतर काही ठिकाणी उमेदवार बदलण्यात येणार आहेत.

MNS and Pune municipal election
Navi Mumbai News: म्हात्रे-नाईक शीतयुद्ध संपलं; कट्टर विरोधक महापालिकेत एकत्र

2012 च्या निवडणुकांमध्ये मनसेने मोठं घवघवीत यश पुणे महापालिकेत मिळवलं होतं. मनसेचे तब्बल 29 उमेदवारांनी विजय मिळवला होता. मनसे हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला होता आणि त्याला विरोधी पक्षनेता पद देखील मिळालं होतं. त्यामुळे 2012 प्रमाणे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा विजय मिळवण्याचं ध्येय मनसेने यंदाच्या निवडणुकीत ठेवला आहे.

दरम्यान दोन्ही पक्षांकडून महापालिका निवडणुकीसाठी अनौपचारिक बैठका सुरू आहेत. यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात येत आहे. असं असलं तरी अद्यापपर्यंत मुंबईतील वरिष्ठांकडून दोन्ही पक्षातील नेत्यांना युती बाबत अधिकृत असा कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे चर्चा पुढे न्यायची का नाही याबाबत दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही पक्षांमधील होणाऱ्या बैठका पुढे ढकलण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com