Samrat Mahadik, Jayant Patil, Anna Dange Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli NCP News: सांगली राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? अण्णा डांगे भाजपच्या वाटेवर

Jayant Patil Vs Anna Dange : जयंत पाटलांचे निकटवर्तीय आमदार मानसिंगराव नाईकांना घेरण्याचा प्रयत्न

Sunil Balasaheb Dhumal

राहुल गडकर

Sangli Political News : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बिनीच्या शिलेदारांतील माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या विधानामुळे सांगलीच्या राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. यामुळे डांगे, पाटलांना सोडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. डांगेंच्या जाहीर विधानामुळे सांगलीच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय, अशी चर्चा जोरात रंगली आहे. (Latest Political News)

शिराळा तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री डांगेंनी भाजपचे सम्राट महाडिक यांचा 'भावी आमदार' असा उल्लेख केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाडिकांना भावी आमदार म्हटल्याने डांगेंनी थेट जयंत पाटील (Jayant Patil) यांचे कट्टर समर्थक आमदार मानसिंगराव नाईक यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे आगामी काळात सांगलीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे बोलले जात आहे.

माजी मंत्री डांगे यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे सम्राट महाडिक उपस्थितीत खळबळजनक विधान केले. त्यांनी भाजप नेते सम्राट महाडिकांचा भावी आमदार असा उल्लेख केला. 'महाडिक हे आमदार होणार म्हणजे होणार,' असे डांगेंनी ठणकावून सांगितल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावर सम्राट महाडिकांनीही 'तुमची प्रार्थना, फळाला येऊ दे, अशी भावना व्यक्त केली. (Maharashtra Political News)

जयंत पाटलांना धक्का?

माजी मंत्री अण्णा डांगे हे आमदार जयंत पाटील यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम आहे. जयंत पाटलांना सोडण्याचा विचार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करताना दिसत नाहीत. मात्र, माजी मंत्री अण्णा डांगे यांनी इस्लामपूर पेठ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन स्वागत केले. त्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पवार व आमचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे डांगे यांनी सांगितले होते. आता पुन्हा एकदा डांगेंनी भाजपच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्याने यांची चर्चा जिल्ह्यात आहे. दरम्यान, शिराळ्याचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांना आतापासूनच घेरण्यास सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT