Asaduddin Owaisi Vs Rahul Gandhi : ओवेसींचं राहुल गांधींना 'चॅलेंज'; म्हणाले, 'वायनाड नाही तर हैदराबादमधून...'

Hyderabad and Wayanad : काँग्रेसच्या राजवटीवर ओवेसींनी ठेवले बोट
Asaduddin Owaisi, Rahul Gandhi
Asaduddin Owaisi, Rahul GandhiSarkarnama

Hyderabad Political News : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना 2024 ची लोकसभा निवडणूक वायनाडमधून नव्हे, तर हैदराबादमधून लढवण्याचे आव्हान दिले आहे. ते हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत सडकून टीका केली. (Latest Political News)

खासदार ओवेसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, 'उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बाबरी मशीद काँग्रेसच्या राजवटीत पाडण्यात आली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला खुले आव्हान दिले. 'राहुल गांधींनी वायनाडमधून नाही, तर हैदराबादमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहे. तुम्ही मोठमोठी आश्वासने देत राहा, पण माझ्याविरोधात मैदानात या आणि लढा,' असे चॅलेंज ओवेसींनी दिले आहे.

Asaduddin Owaisi, Rahul Gandhi
Kirit Somaiya Video : किरीट सोमय्यांना 'व्हिडिओ व्हायरल'ची धमकी; मागितली ५० लाखांची खंडणी

तेलंगणामध्ये, काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांमध्ये विधानसभा निवडणुका जिंकण्याची चुरस निर्माण झालेली आहे. यातूनच ओवेसींनी काँग्रेससह राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले, 'काँग्रेसचे लोक माझ्याविरोधात खूप काही बोलत आहेत. पण मी तयार आहे. माझ्याकडेही खूप काही सांगण्यासारखे आहे, असे म्हणत त्यांनी बाबरी मशीद आणि सचिवालयाची मशीद काँग्रेसच्या राजवटीत पाडण्यात आली,' असा घाणाघात ओवेसींनी केला. (Maharashtra Political News)

दरम्यान, तेलंगणातील तुक्कुगुडा येथील एका सभेत राहुल गांधींनी भाजप, बीआरएस आणि एमआयएमवर सडकून टीका केली होती. राहुल म्हणाले होते, 'एकमेकांना वेगळे म्हणवणारे भाजप, बीआरएस आणि एमआयएम दक्षिणेकडील राज्यात एकजुटीने काम करतात. काँग्रेस मात्र या त्रयीविरुद्ध लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे लोक असल्यानेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सीबीआय किंवा ईडी खटले नाहीत,' असा आरोप त्यांनी केला होता. यावर उत्तर देताना ओवेसींनी राहुल गांधींना हैदराबादमधून निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिले आहे.

Asaduddin Owaisi, Rahul Gandhi
Kolhapur-Sangli Politics : कोल्हापूर, सांगली भाजपात अंतर्गत वादाची ठिणगी ; बावनकुळे कसा सोडवणार तिढा ?

तेलंगणातील निवडणुकीपूर्वी, काँग्रेसने आपली 'सहा हमी' घाेषणा जाहीर केली आहे. सत्तेत आल्यास त्या सर्व घोषणा पूर्ण केल्या जातील, असेही राहुल गांधींना सांगितले होते.

काँग्रेसने जाहीर केलेल्या सहा घोषणा

  • महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत महिन्याला अडीच हजार रुपये देण्यात येतील.

  • महिलांना मोफत बस प्रवास दिला जाईल.

  • शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल.

  • शेजमजुरांना १२ हजार रुपये देण्यात येतील.

  • शेतकऱ्यांना धान पिकावर ५०० रुपयांचा बोनसही देण्यात येईल.

  • सर्व घरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल.

(Edited by Sunil Dhumal)

Asaduddin Owaisi, Rahul Gandhi
Supriya Sule On BJP: भाजपविरोधात बोलले की काहीतरी कटकारस्थान होतेच; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com