Chandrakant Patil _Sudhir Gadgil 
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News: सुधीर गाडगीळांच्या 'लेटर बॉम्बला' चंद्रकांतदादांनी भेटूनच दिलं उत्तर; एकाच वाक्यात केलं शांत!

Sangli News: सांगली जिल्ह्यातील भाजपमध्ये जुना आणि नव्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

Rahul Gadkar

Sangli News: सांगली जिल्ह्यातील भाजपमध्ये जुना आणि नव्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची बाजू घेऊन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी थेट पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेविरोधातच पत्रकबाजी केली. चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेबद्दलची तक्रार वरिष्ठांकडे न करता त्यांनी माध्यमात दिलेल्या पत्रांमुळे सांगलीमधील भाजपमधील अंतर्गत संघर्ष सर्वांसमोर आला होता. त्यामुळे जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसात या वादावर पडदा टाकला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पत्रकावर एका वाक्यात समजूत काढत आमदार गाडगीळ यांच्या मनातील मतभेद दूर केले आहेत.

कोल्हापुरात आज एका दैनिकाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील भाजपच्या परिस्थितीबद्दल वक्तव्य केले. सुधीर गाडगीळ यांनी वर्तमानपत्रांना ते पत्र ज्याला नको होते. पण त्यांच्या मनात येणं स्वाभाविकच होते, नवे पक्षात आले तर जुन्यांचं काय?

दिवसभर मी सांगलीत होतो. आज सकाळीच मी त्यांना बोललो आहे. आठवड्यातून दोन वेळा मी येतो. माझ्यावर तुमचे इतके प्रेम आहे. की तुम्ही मला विचारणे गरजेचे होते. आज मी त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तुम्ही 22 जागांची फिगर आणली कुठून? हा सवाल देखील आमदार गाडगीळ यांना केला. 43 जागा या भाजपच्या आहेत, सहा जागा या जयश्री ताई यांच्या आहेत. जनसुराज्यला देखील काही जागा हव्यात, मग ते क्लिअर झाले. त्यावर आमदार गाडगे यांनाच चंद्रकांत पाटील यांनी सुनावले. तुम्ही काय निष्ठावंतांची बाजू घेणार? तुमच्यापेक्षा मी अगोदर आग्रही असतो. असे म्हणत या वादावर पडदा टाकला.

घाटगेंच्या घरवापसीवर बोलणं टाळलं

भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलणे टाळले. हसत हसत निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT