Sangli District Central Cooperative Bank Scam Raju Shetti news
Sangli District Central Cooperative Bank Scam Raju Shetti news Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News: सांगली बँक गैरव्यवहार प्रकरणात 'स्वाभिमानी'ची उडी; राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा

Mangesh Mahale

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत (Sangli District Central Cooperative Bank Scam) गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच सरकारच्या निधीवर डल्ला मारल्याने ही बँक चर्चेत आहे. प्रकरणी जिल्हा बँकेवर प्रशासक नेमावा,अन्यथा भ्रष्टाचारप्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारला दिला आहे.

बँकेवर प्रशासक नेमण्याबरोबर बँकेची सखोल चौकशी करा,अशी मागणी राजू शेठ्ठी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सरकारला दिले आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सहा शाखांमध्ये दोन कोटी 43 लाखांचा दुष्काळ आणि अवकाळी निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घोटाळाप्रकरणी बँकेकडून सात जणांना निलंबित देखील करण्यात आले आहे.या प्रकरणात आता राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बँकेच्या हातनूर,नेलकरंजी,तासगाव,निमणी,सिद्धेवाडी,बसर्गी या सहा शाखांमध्ये सरकारी निधीत दोन कोटी 43 लाख रुपयाचा अपहार प्रथमदर्शनी दिसते. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणातील व्यक्तींचे निलंबन न करता त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करून अपहार केलेली रक्कम व्याजासहित वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये सोने तारण,ठेवीवरील व्याजासह,दुष्काळ,अतिवृष्ट,अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई चे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आलेले आहेत.सध्याचा झालेला गैरव्यवहार सहा शाखांमध्ये झालेला असून यामध्ये बँकेने बोगस ताळेबंद दाखविले असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT