Sanjay Patil, Rohit Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Patil: लोकसभेला जिव्हारी लागणारा पराभव, संजयकाकांचं पुढचं लक्ष्य ठरलं; म्हणाले,'शिकारीसाठी दोन पावलं...'

Sangli Political News : पुढे दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत.या निवडणुकीत ताकदीने काम करून आपल्याला विधानसभा जिंकायची असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. पण आता...

Deepak Kulkarni

Sangli News : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 'चारशे पार'चा नारा हवेतच राहिला.महाराष्ट्रातही मिशन 45 फेल ठरलं. एवढंच नव्हे तर भाजपची अनेक दिग्गज नेत्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. यात रावसाहेब दानवे,कपिल पाटील, भारती पवार, हिना गावित,पंकजा मुंडे यांच्यासह सांगलीच्या संजयकाका पाटील या नेत्यांचाही समावेश आहे.

पराभव झाल्यानंतरही काही नेत्यांकडून आगामी निवडणुकीसाठी जोर लावण्याचं काम सुरू आहे.अशातच आता माजी खासदार संजय पाटलांनी (Sanjay Patil) विधानसभा निवडणूक लढवण्याची संकेत दिले आहेत.

तासगावमधील एका कार्यक्रमात भाजप (BJP) नेते आणि माजी खासदार संजयकाका पाटील बोलत होते.यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात झालेल्या आपल्या पराभवाचं कारणही सांगितलं.ते म्हणाले, सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यापेक्षा जातीपातीचं राजकारण झाल्यामुळे माझी अडचण झाली.पण या पराभवानं खचून जाणारा हा संजय पाटील नक्कीच नाही.

पाटील म्हणाले,पुढे दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत.या निवडणुकीत ताकदीने काम करून आपल्याला विधानसभा जिंकायची असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. पण आता त्यांच्या या वक्तव्यामुळे संजयकाका स्वत:मैदानात उतरणार की मुलगा निवडणूक लढवणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

तासगावमधून यंदा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना तिकीट मिळण्याची चिन्हे आहेत.खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनीच तसे संकेत दिले आहेत.त्यांचं निवडणूक लढवणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात असतानाच आता संजयकाकांनीही विधानसभेची तयारी सुरू केल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी करत विशाल पाटलांनी भाजप उमेदवार संजयकाका पाटलांची हॅट्रिक हुकवत त्यांना पराभवाचा धक्का दिला होता.हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. आता त्यांनी झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत विधानसभेसाठी दंड थोपटले आहे.

त्यांनी शिकार करायची असेल तर दोन पावले मागे यावे लागते, असेही संजयकाका म्हणाले. तथापि, संजय पाटील यांनी स्वतः विधानसभा लढवणार की मुलगा प्रभाकर यांना निवडणुकीत उतरवणार? याविषयी सांगलीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT