Vidharbh Politic's : आता बोला! अजितदादांचा भाजपच्याच मतदारसंघावर दावा; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

NCP's Jan Sanman Yatra : जन सन्मान यात्रेचा कार्यक्रमासाठी अजित पवार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. काटोल येथे या यात्रेचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम काटोलवर दावा करण्यासाठीच करण्यात आला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 31 August : महायुतीमुळे आता भाजपचीच मोठी अडचण होऊ लागली आहे. भाजपने एकदा जिंकलेल्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला आहे, त्यामुळे भाजप इच्छुकांमध्ये मोठी चलबिचल सुरू झाली आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाचे अनिल देशमुख आमदार आहेत.

जन सन्मान यात्रेच्या (Jan Sanman Yatra) कार्यक्रमासाठी अजित पवार (Ajit Pawar) नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. काटोल येथे या यात्रेचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम काटोलवर (Katol) दावा करण्यासाठीच करण्यात आला आहे.

अजित पवार यांनीसुद्धा ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तेथेच कार्यक्रम घेणार असल्याचे जाहीर केले आहे. हे पाहता काटोल आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोडणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

काटोलचे आमदार अनिल देशमुख हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्या विरोधात भाजपच्या चरणसिंह ठाकूर यांनी निवडणूक लढवली होती. दोघांमध्ये ११ हजार मतांचा फरक आहे. त्यापूर्वी अनिल देशमुख यांना भाजपच्या आशिष देशमुख यांनी पराभूत केले होते. हा मतदारसंघ जिंकण्याची तयारी पाच वर्षांपासून भाजपकडून केली जात आहे.

Ajit Pawar
Raosaheb Danve : रावसाहेब दानवे भाजपला 2019 मधील ‘ते’ करिश्माई यश विधानसभेला मिळवून देणार?

या मतदारसंघातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी भाजपने आपल्याकडे वळवले आहे. जिल्हा परिषद सदस्यांनाही सोबत घेतले आहेत. शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनाही भाजपने ऑफर दिली आहे. उमेदवारी मिळावी म्हणून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण वेटिंगवर थांबले आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्यासाठी जागा सोडल्यास भाजपत मोठा असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजप-शिवसेनेची युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. त्यामुळे भाजपला आपली पाळेमुळे येथे रुजवता आली नव्हती. युती, आघाडी तुटल्यानंतर भाजपने येथे मुसंडी मारली. आशिष देशमुख यांच्या रुपाने भाजपने येथे आपले खाते उघडले होते. त्यांनी आपल्या काकांनाच पराभूत केले होते. आशिष देशमुख पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar NCP : अजितदादांचं विधानसभेचं जागावाटप ठरलं! 54 फिक्स तर टार्गेट 'इतक्या' जागांचं

मागील वेळा निवडणूक लढवलेले चरणसिंह ठाकूर यांना पुन्हा एकदा संधी हवी आहे. याशिवाय डझनभर इच्छुक येथून निवडणुकीची तयारी करीत आहेत. आता भाजप अजितदादांसोबत निर्माण झालेला जागेचा तिढा कसा सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com