Sangli Politics : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : ...तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; म्हैसाळचा पाणीप्रश्न इरेला पेटला

Sangli Political News : "स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आमचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही का?"

सरकारनांमा ब्यूरो

अनिल कदम -

Sangli News : जत तालुक्याच्या पूर्वभागाला वरदान ठरलेल्या विस्तारित 'पाणी योजने'च्या पहिल्या टप्याचे काम सुरु झाले आहे. मात्र, वंचित गावांना लाभ देण्याचा पत्ताच दिसत नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्वेक्षण करून प्रशासकीय मान्यतेसह उर्वरित कामांची निविदा काढावी. निविदा काढले नाही तर उपोषण, रस्ता रोको, मोर्चे काढण्यात येईल. याची दखल न घेतल्यास लोकसभा निवडणुकीवर 65 गावे बहिष्कार टाकतील, असा इशारा भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. सर्वपक्षीय नेत्यांनी इशाऱ्यामुळे आता म्हैसाळचा पाणीप्रश्न आता इरेला पेटले आहे. (Latest Marathi News)

जतमध्ये विस्तारित म्हैसाळ योजनेसंदर्भात माजी आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली, बैठकीत नाजी सभापती सुरेश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग, माजी सभापती आकाराम मासाळ, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, दिग्विजय चव्हाण, बाजार समितीचे माजी संचालक अभिजित चव्हाण उपस्थित होते.

माजी आमदार जगताप म्हणाले, '1988 पासून आम्ही पाण्यासाठी संघर्ष करीत आहोत. चाळीस वर्षे झाली तरी अद्याप मूळ योजनाच पूर्ण नाही. योजनेपासून वंचित गार्वांनी संघर्ष केल्यानंतर योजना करण्यात आली. यासाठी 1 हजार 900 कोटी मंजूर करण्यात आले. यातील पहिल्या टप्यासाठी 900 कोटी देण्यात आले. याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र 65 गावांसाठीच्या कामांचा अद्याप पत्ताच नाही. या गावांना न्याय देण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. याप्रश्नी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषण फेब्रुवारीत रास्ता रोको, मार्चमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याची दखल न घेतल्यास वंचित 65 गावे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील.

प्रारंभी म्हैसाळचे उपअभियंता अनिकेत पाटील यांनी विस्तारित योजनेची माहिती देताना म्हणाले, विस्तारित योजनेचे सर्वेक्षण सुरू आहे. प्रत्येक गावातील लाभक्षेत्राचा नकाशा गावात लावण्यात येईल, यातूनही काही भाग वंचित राहिल्यास त्यांचाही या योजनेमध्ये समावेश करून घेण्यात येईल. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, संग्राम जगताप, विष्णु चव्हाण, रमेश जगताप, मिलिंद पाटील, मंगेश सावंत, राजेंद्र डफळे, सोमन्ना हक्के यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

येळदरीपासून चार मुख्य जलवाहिन्या -

विस्तारित योजनेत येळदरीपासून चार मुख्य जलवाहिन्या जाणार आहेत. पहिली मुचंडी-अटकळवाडी, दुसरी उमदी, तिसरी उमराणी आणि चौधी वाशाण अशी 534 किलोमीटरची जलवाहिनी जाणार आहे. त्यानंतर उपवाहिन्यांचे कामही होणार आहे, या योजनेतून संख, दोडनाला मध्यम प्रकल्पासह 25 तलाव, 323 पाझर तलाव आणि 30 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेण्यात येतील. या योजनेतून 1 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT