Pimpri-Chinchwad News : राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील बहूतांश पक्ष हा अजित पवारांबरोबर गेला. राहिलेल्यांनी शरद पवारांची साथ दिली. पण, त्यांच्या गटात सहा महिन्यांतच सुप्त संघर्ष आणि गटबाजी सुरु झाल्याचे दिसत आहे. अखेर आखणी एक पदाधिकाऱी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडला आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या पक्षाच्या एका कार्यक्रमातून शरद पवार राष्ट्रवादीतील सुप्त संघर्ष आणि गटबाजीला दुजोरा मिळाला. त्याला पक्षाचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित असूनही शहराध्यक्ष तुषार कामठे हे तिकडे शहरात असूनही फिरकले नाहीत. त्याबाबत त्यांच्याशी विचारणा करण्यासाठी दोनदा फोन करूनही त्यांनी तो उचलला नाही.
दरम्यान, नुकताच पक्षाला रामराम ठोकलेले पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पिंपरी-चिंचवडकर राजन नायर यांनी उद्योगनगरीतील पक्षातील गटबाजीमुळे तो सोडल्याचे सरकारनामाला सांगितले. शहर पक्षात समन्वय नसल्याचा आरोप त्यांनी केला आणि आपण घरवापसी केली असं सांगत, त्यांनी अजित पवार(Ajit Pawar) गटात प्रवश केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपमधून येऊन शहराध्यक्ष झाल्याने कामठेंविषयी शरद पवार(Sharad Pawar) गटातील काहीजण नाराज आहेत. सर्वांना बरोबर न घेता फक्त काहींना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीला जुन्या एकनिष्ठ राष्ट्रवादी पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा आक्षेप असल्याचं बोललं जातं. त्यात गेल्या महिन्यात त्यांनी जाहीर केलेल्या शहर कार्यकारिणीत अनेक पदे ही एकाच प्रभागात (वीस) दिल्यामुळेही अनेकजण नाराज झाले आहेत.
शिवाय पक्षाचे शहर कार्यालय प्रथम काळेवाडीत करण्याचे ठरले. ते तयारही झाले. पण,नंतर ऐनवेळी पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ते सुरु करण्यात आले. त्यामुळे त्यासाठी काळेवाडीत त्यावर मोठा खर्च केलेले पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले. ते पिंपरी कार्यालयाकडे फिरकत नाहीत. गेले,तर विचारले जात नाही,अशी खंत एकाने व्यक्त केली.
या सुप्त संघर्षातून काहींना थेट पदावरून दूर करण्याची धमकी देण्यात आली आहे,असे एकजण म्हणाला.दरम्यान,शहराची जबाबदारी देण्यात आलेले आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रा व इतर कार्यबाहूल्यामुळे गेल्या काही कालावधीत शहरात न आल्याने ही गटबाजी वाढत चालल्याचंही बोललं जात आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पिंपरी-चिंचवडने सोमवारी (ता.15) शरद पवार क्रीडा महोत्सव शहरात भरवला. त्याचे बक्षीस वितरण पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण शहराध्यक्ष कामठेंना देण्यात आले होते. त्यावर त्यांचे नावही होते. तरीही ते शहरात असूनही या कार्यक्रमाला न आल्याने पक्षातील गटबाजी व मतभेदाची मोठी चर्चा झाली.
दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी गटातून गेल्या महिन्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत गेलेले शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या यावेळच्या हजेरीचे कौतूक झाले.पक्षाचे शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख,महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर,युवक शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर, कामगार नेते काशिनाथ नखाते आदी यावेळी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.