"Sharad Arun Lad’s possible entry into BJP sparks political turmoil in Sangli and challenges Sharad Pawar’s NCP." Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : दसऱ्यानंतर सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बॉम्ब फुटणार, आमदार पुत्र भाजपात जाणार?

Sharad Pawar’s NCP Faces Crisis After Dussehra : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर लाड यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा या मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा असणार आहे.

Rahul Gadkar

Sharad Pawar NCP crisis : पुणे पदवीधर मतदारसंघात अनेक इच्छुकांनी मतदार नोंदणीवरून शक्तीप्रदर्शनाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा सुरू झाली आहे. युतीत दोन पक्षांचा दावा असला तरी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील एका आमदारांचे पुत्र भाजपच्या वाटेवर आहेत. दसऱ्यानंतर कोणत्याही क्षणी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. केवळ औपचारिकता बाकी असल्याचं सांगितले जात आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदारयादी नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला. डिसेंबर 2026 मध्ये पुणे पदवीधरसाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी एक वर्ष अगोदरच इच्छुकांनी भाऊगर्दी केली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अरुण बापू लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर लाड यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा या मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा असणार आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांचे पुत्र शरद लाड हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

दुसरीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक भैय्या माने यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. तर या मतदारसंघावर भाजपचा पूर्वीपासून दावा आहे. सध्या भाजपकडे उमेदवार नसला तरी महाविकास आघाडीतील विद्यमान आमदारांच्या पुत्रांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. आमदार पुत्रांनी पदवीधर च्या उमेदवारीचा शब्द भाजप पुढे ठेवला आहे. त्याची चर्चा अंतिम टप्प्यात सुरू आहे.

मागील दोन दिवसांपासून पक्ष प्रवेशासंदर्भात सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहेत. पक्षश्रेष्ठींसोबत अंतिम चर्चा झाल्याचे देखील सूत्रांकडून समजत आहे. दसऱ्यानंतर या पक्षप्रवेशाला गती येणार असून ऑक्टोबर महिन्यातच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा भाजपसह राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT