Vinod Tawde News : विनोद तावडेंनी नेत्यांमधील जुना वाद मिटवत सुपरस्टारला आणलं पक्षात; 'एनडीए'ची ताकद वाढवली...

NDA Gains Strength in Bihar with New Entry : लोकसभा निवडणुकीत पवन सिंह यांचाही पराभव झाला होता. या निवडणुकीत सीबीआय पक्षाचे राजा राम सिंह यांना मतविभाजनाचा फायदा झाल्याने ते विजयी झाल्याची त्यावेळी चर्चा होती.
"Vinod Tawde welcomes Bhojpuri superstar Pawan Singh into the party, boosting NDA’s political strength in Bihar."
"Vinod Tawde welcomes Bhojpuri superstar Pawan Singh into the party, boosting NDA’s political strength in Bihar."Sarkarnama
Published on
Updated on

Political Impact of Pawan Singh’s Inclusion : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी एनडीएनेही कंबर कसली असून नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पावले टाकली जात आहेत. बिहार भाजपचे प्रभारी व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना मंगळवारी असाच एक पाच वर्षांपूर्वीचा वाद मिटविण्यात यश आले आहे.

भोजपुरीतील सुपरस्टार पवन सिंह यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी अचानक उमेदवारी नाकारात अपक्ष उमेदवारी म्हणून ही निवडणूक लढवली होती. काराकट मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीमुळे एनडीएतील मित्रपक्षाचे प्रमुख उमेदवार उपेंद्र कुशवाहा यांचा पराभव झाला होता.

लोकसभा निवडणुकीत पवन सिंह यांचाही पराभव झाला होता. या निवडणुकीत सीबीआय पक्षाचे राजा राम सिंह यांना मतविभाजनाचा फायदा झाल्याने ते विजयी झाल्याची त्यावेळी चर्चा होती. त्यामुळे कुशवाहा यांनी पवन सिंह यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त करत मोर्चा उघडला होता. आज या वादावर पडदा टाकण्यात आला आहे.

"Vinod Tawde welcomes Bhojpuri superstar Pawan Singh into the party, boosting NDA’s political strength in Bihar."
Asia Cup 2025 update : भारताला ट्रॉफी देईन, पण..! ‘पाक’च्या मंत्र्यांनी घातली कधीच मान्य होणार नाही अशी अट...

भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांच्या प्रयत्नातून पवन सिंह आणि कुशावाह यांच्यात समेट घडून आल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी तावडे यांनी पवन सिंह यांना सोबत घेत राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तिथे पवन सिंह यांनी कुशवाह यांचे पाय धऱले.

या भेटीनंतर विनोद तावडे हे पवन सिंह यांना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी घेऊन गेले. त्यामुळे आगामी निवडणुकीत पवन सिंह रिंगणात असतील, या चर्चांनी जोर धरला आहे. भाजपला त्याचा फायदा भोजपूर, बक्सर, रोहतास, कैमूरसह जवळपास 22 मतदारसंघात होऊ शकते, अशी शक्यता आहे. पवन सिंह यांची पत्नीही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

"Vinod Tawde welcomes Bhojpuri superstar Pawan Singh into the party, boosting NDA’s political strength in Bihar."
Ex CJI Chandrachud : मोठी बातमी : माजी CJI चंद्रचूड यांचे अयोध्येबाबतचे ‘ते’ विधान वादात; राम मंदिर निकालाविरोधात होऊ शकते याचिका

बिहारमध्ये पवन सिंह यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे भाजपकडून पवन सिंह यांना पुन्हा पक्षात सक्रीय करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पवन सिंह यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक केले होते. तेजस्वी जेव्हा बोलता तेव्हा ते हृदयाला भिडते. ते तळागाळातील नेते असल्याचेही पवन सिंह म्हणाले होते. त्यामुळे ते राष्ट्रीय जनता दलात जाणार असल्याची चर्चाही होती.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com