Shiral Taluka Politics Local body election 2025 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP News: चंदगड पाठोपाठ आता सांगलीतही राष्ट्रवादी एकत्र; मानसिंगराव नाईकांच्या निर्णयाचा विरोधकांना धसका

Shiral Taluka Politics Local body election:भाजपला मोठा धक्का देत मानसिंगराव नाईक यांनी माजी नगरसेवक अभिजित नाईक, वैशाली नाईक, विक्रमसिंह नाईक, गायत्री नाईक यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश देत 'घरवापसी' घडवून आणली.

Rahul Gadkar

Sangali News: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका पाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देखील दोन्ही राष्ट्रवादींचे सूत जमलं आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी या विषयाचा तुकडा पाडत एकाही विरोधकाला जागा मिळतातच कामा नाही, असा सज्जड दम दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देत आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये उलट सुलट चर्चा होती. चर्चांनाच माजी आमदार नाईक यांनी उत्तर देत पूर्णविराम दिला आहे.

भाजपला मोठा धक्का देत मानसिंगराव नाईक यांनी माजी नगरसेवक अभिजित नाईक, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती, सदस्य वैशाली नाईक, विक्रमसिंह नाईक, गायत्री नाईक यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश देत 'घरवापसी' घडवून आणली.

यावेळी बोलताना माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख मंडळी, कार्यकर्त्यांनी एकसंध व जिद्दीने काम करून विरोधकांना शिराळा नगरपंचायतीमधील एकही जागा जिंकता येणार नाही, असा बंदोबस्त करावा," असा इशारा थेट विरोधकांना देत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिराळा नगरपंचायतीसह पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवतील, हे स्पष्ट केले.

मानसिंगराव नाईक म्हणाले, "शिराळ्यात विरोधकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. सर्व कार्यकर्त्यांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून हातात हात घालून काम केल्यास विरोधकांना एकही जागा जिंकता येणार नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीत घटलेल्या मतदानाचा वचपा काढता येईल."

"विरोधकांनी आतापर्यंत शिराळ्याच्या विकासाविषयी जनतेची दिशाभूल केली आहे. तोरणा ओढा सुशोभीकरण, किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम यासह अनेक कामांना खोडा घालण्याचे काम केले आहे," असा आरोप केला.

"आमच्यापासून काही काळ बाजूला गेलेले अभिजित, वैशाली, विक्रम व गायत्री मूळ कुटुंबात व प्रवाहात आजपासून पुन्हा सहभागी झाले आहेत. त्यांच्या निर्णयामुळे निश्चितच मोठा परिणाम होणार आहे," असे नाईक यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT