BMC Election 2025: आरक्षणानंतर राजकीय पक्षांमध्ये संभ्रम; ‘वॉर्डच नाही तर उमेदवार कुठून उभा राहणार’; मनसे आक्रमक

KDMC Prabhag Reservation News update: प्रभाग कुठले, सीमारेषा कुठल्या आणि उमेदवाराने नेमके कोणत्या वॉर्डातून अर्ज करायचा हे काहीच स्पष्ट नसल्याने इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.मनसेचे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी यावर सडकून टीका केली आहे.
  Local Body Elections
Local Body Electionssarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: प्रभागरचना करण्यात विलंब झाल्याबाबत निवडणूक आयोगावर आधीच टीका होत होती. आता आरक्षण जाहीर झाले असले तरी वॉर्ड नकाशे अस्तित्वात नसल्याने सर्वच पक्षातील इच्छुक नगरसेवकांमध्ये संभ्रम आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय ‘अ-ब-क-ड’ असे आरक्षण जाहीर करण्यात आले, मात्र वॉर्ड रचना अद्याप निश्चित न झाल्याने, या आरक्षणाचा वास्तविक उपयोग कसा होणार याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रभाग कुठले, सीमारेषा कुठल्या आणि उमेदवाराने नेमके कोणत्या वॉर्डातून अर्ज करायचा हे काहीच स्पष्ट नसल्याने इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.मनसेचे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी यावर सडकून टीका केली आहे.

आरक्षण सोडत जाहीर होताच राजू पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली आहे. प्रभागनिहाय अ-ब-क-ड असे आरक्षण जाहीर झाले, पण वॉर्डच तयार नाही. उमेदवार कुठून उभा राहणार, हेच कळत नाही. हा आयोगाने घातलेला अजून एक गोंधळच म्हणावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्षांनाही त्यांनी टोला लगावला आहे.

  Local Body Elections
Local Body Elections 2025: आरक्षण जाहीर; आता कागदपत्रांसाठी धावपळ!

पॅनेल जरी ठरवले, तरी त्या पॅनेलमध्ये कोणता वॉर्ड येणार याबाबत महापालिकेने कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. पॅनेलमध्ये अ-ब-क-ड अशी चार उपप्रभागांची रचना असली तरी या अक्षरांच्या मागे प्रत्यक्षात कोणते भूभाग आहेत, याबाबत कोणताही खुलासा नाही. त्यामुळे घोषित केलेल्या आरक्षणाला भौगोलिक आधारच नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता वॉर्ड रचना कधी जाहीर होते आणि उमेदवारांना स्पष्ट चित्र कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संभ्रम कायम

निवडणूक आयोगावर आधीच प्रभागरचना विलंब झाल्याबाबत टीका होत होती. आता आरक्षण जाहीर झाले असले तरी वॉर्ड नकाशे अस्तित्वात नसल्याने सर्वच पक्षातील इच्छुक नगरसेवकांमध्ये संभ्रम आहे. तिकीट मागणीची प्रक्रिया कशी सुरू होणार आणि कोणत्या भागात कोणते आरक्षण लागू आहे याचा ताळमेळ कसा बसणार या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. राजकीय विश्लेषकांच्या मते, अशा प्रकारच्या अस्पष्ट प्रक्रियेमुळे निवडणूकपूर्व गोंधळ वाढू शकतो आणि सत्ताधाऱ्यांना हवा तसा फायदा मिळण्याचा मार्ग मोकळा होतो, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com