Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली असून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीनंतर थेट सरपंचावरच बंदूक ताणण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे संशयीताने सरपंचावरच रिव्हॉल्व्हर ताणली, गोळी झाडण्यासाठी ट्रिगरही ओढला. पण नशीब बलवत्तर यात त्यांचा जीव गेला नाही. गोळीच झाडली गेली नाही. यानंतर सरपंचांनी आष्टा पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. ज्यानंतर आता संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु्न्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव विद्याजितराजे ऊर्फ संदीप दीपक धनवडे (रा. वाळवा) असे आहे.
दरम्यान या घटनेत संताप जनक बाब देखील समोर आली असून वाळव्याचे सरपंच असणाऱ्या संदेश कांबळे यांना मात्र पोलिसांना लगेच तक्रार दाखल करून न घेत तब्बल दहा ते बारा तास ताटकळत बसवून घेतल्याचा आरोप सरपंचानी केला आहे. या प्रकरणानंतर आता पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात असून पोलिसांवर संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी (ता. २६) महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विद्याजितराजे धनवडे याने वाळव्यात मिरवणूक आयोजित केली होती. मिरवणूक संपल्यानंतर ध्वनिक्षेपकावरून विद्याजितराजे धनवडे याने संदेश कांबळे यांचे नाव घेऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. त्यावेळी सरपंच संदेश कांबळे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ते त्यांच्या फुलेनगरातील घरी जाऊन झोपले.
मात्र रात्री साडेअकराच्या सुमारास धनवडे याने कांबळे यांच्या घरासमोर पुन्हा शिवीगाळ केली. आवाज ऐकून कांबळे घराचा दरवाजा उघडून बाहेर आले. यावेळी धनवडे याने कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याजवळ असलेले रिव्हॉल्व्हर काढून कांबळे यांच्या दिशेने रोखले.
यावेळी त्याने गोळी झाडण्यासाठी ट्रिगर ओढला; मात्र गोळीबार झाला नाही. त्याने परत कांबळे यांना शिवीगाळ करून धमकी दिली. यानंतर आष्टा पोलिसांत याबाबत तक्रार देण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
तक्रार घेतली नाही...
मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आष्टा पोलिस ठाण्यात मी तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो. तेथे दहा ते बारा तास ताटकळत ठेवून माझी तक्रार नोंद करून घेण्यास आधी टाळाटाळ केली. तालुक्यातील गावच्या सरपंचाची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांना कसा न्याय मिळत असेल.
- संदेश कांबळे, सरपंच वाळवा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.