ZP Election Impacts On District Central Bank Politics; Jayant Patil and MLA suhas babar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil Politics : सांगलीत जयंत पाटील सुहास बाबर यांची सेटलमेंट? एका सत्कारानं पडद्यामागचीं समीकरणं उघड

ZP Election Impacts On District Central Bank Politics : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी भाजपच्या महत्वाकांक्षाना सुरूंग लावत महाविकास आघाडी आणली.

Aslam Shanedivan

  1. महाविकास आघाडीने तानाजी पाटील यांना सोबत घेत पृथ्वीराज यांना सभापतीपद दिले.

  2. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.

  3. आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी ही रणनीती महत्त्वाची ठरणार आहे.

Sangli News : आटपाडीचे शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील जिल्हा परिषदेचे सभापती झाले, पण ते महाविकास आघाडीकडून झाले. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील सत्तेत ते सहभागी झाले. त्याच दिवशी सायंकाळी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी पृथ्वीराज पाटील यांचा विट्यात फेटा बांधून सत्कार केला.

मात्र बाबर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत भाजपला पाठींबा दिला होता. तर तानाजीरावांनी आपले दोन सदस्य गैरहजर ठेवले होते. या मांडणीतून शिवसेना आणि बाबर-पाटील यांची स्थानिक राजकारणात समझोता एक्स्प्रेस सुसाट धावताना दिसते आहे. तर आगामी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जयंत पाटील साखरपेरणी करताना दिसत आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे सात सदस्य विजयी झाले. यापैकी दोन तानाजी पाटील यांच्या आटपाडी तालुक्यातील असून एक त्यांचा मुलगा पृथ्वीराज. सत्ता स्थापन करताना भाजपकडे १६ सदस्य होते. जनसुराज्य व रयतचे प्रत्येक एकेक असे त्यांचे संख्या बळ झाले १८. यानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा करत शिवसेना आपल्या सोबत असल्याची घोषणा करण्यात आली

ज्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी आपले सगळे सात सदस्य घेऊन महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन न करता भाजपचा पराभव दिसत असताना त्यांच्यासोबत जाण्याचे ठरवले. हरलेल्या डावात ते भागीदार झाले आणि राज्यातील सत्ताकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तर जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा थेट रोष घेण्याचे त्यांनी टाळले.

या खेळात भाजपचे एकूण सदस्यांची संख्या २५ वर अडली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपला मोर्चा अजितदादांच्या राष्ट्रवादी वळवत पुन्हा एकदा अध्यक्ष आमचाच होईल अशी घोषणा केली. मात्र तळ्यात-मळ्यात भूमिका असलेल्या राष्ट्रवादीच्या बहुतांश मंडळींनी शेवटी महाविकास आघाडीला पाठींबा दिला.

दरम्यान या खेळात सुहास बाबर यांना सत्तेच्या बळावर विटा पालिका आणि खानापूर पंचायत समितीचा कारभार हाकायचा असल्याचे उघड झाले आहे. तर त्यांना आपली ताकद तिथे वाढवायची आहे. भाजपला थेट अंगावर घेऊन नुकसानच होणार असल्याचे त्यांनी गणित कळल्याने हे नुकसान त्यांनी हुशारीने टाळले.

त्याचवेळी तानाजी पाटील यांना मात्र त्यांनी ‘ज्या जिले अपनी जिंदगी’, असेच संकेत देत पूर्ण सुट दिली. ज्यामुळे तानाजीरावांनी महाविकास आघाडीला थेट पाठिंबा न देता आपले दोन सदस्य गैरहजर ठेवले. सत्तेचा खेळ बिघडणार नाही, याची पुरेपूर काळजी तानाजी पाटलांना पुढे करत सुहास बाबर यांनी घेतली.

आता महाविकास आघाडीने तानाजी पाटील यांना सोबत घेत पृथ्वीराज यांना सभापतीपद दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला आले आहे. ही मांडणी अन्य संस्थांच्या राजकारणापेक्षा आगामी काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महत्वाची मानली जात आहे. जयंत पाटील यांनी तानाजीरावांना बळ देऊन पडळकर विरोधकाला बळ देण्याचे धोरण राबवले आहे. या खेळात सुहास बाबर अप्रत्यक्ष सहभागी असल्याने भविष्यात रंगत वाढत जाणार हे स्पष्ट आहे.

FAQs :

1. या निवडणुकीत काय निर्णय झाला?
महाविकास आघाडीने पृथ्वीराज यांना सभापतीपद दिले.

2. तानाजी पाटील यांची भूमिका काय आहे?
त्यांना सोबत घेत नवे राजकीय समीकरण तयार करण्यात आले.

3. जयंत पाटील यांनी काय रणनीती वापरली?
त्यांनी तानाजी पाटील यांना बळ देऊन विरोधकांवर दबाव टाकला.

4. या निर्णयाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत याचा मोठा प्रभाव पडू शकतो.

5. सुहास बाबर यांचा या प्रकरणात काय संबंध आहे?
ते अप्रत्यक्षपणे या राजकीय घडामोडींमध्ये सहभागी असल्याचे मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT