

Jayant Patil News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात अर्थसंकल्प मांडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे गैरहजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प साजर केला. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना देखील त्यांनी जाहीर केली. विरोधकांकडून हा फसवा अर्थसंकल्प असल्याची टीका करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प सादर केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे गैरहजर होते.
जयंत पाटील हे सभागृहाचे सदस्य असल्यापासून मागील 36 वर्षापासून अर्थसंकल्प सादर होत असताना सभागृहामध्ये हजर होते. ते स्वतः देखील अर्थमंत्री होते. त्यामुळे तब्बल 9 वर्ष अर्थसंकल्प त्यांनी मांडला आहे. मात्र, या वेळी ते सभागृहात गैरहजर असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या सर्व चर्चांना पूर्ण विराम देत जयंत पाटील यांनी सभागृहात गैरहजर हजर राहण्याचे कारण सांगितले आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'गेल्या 36 वर्षांपासून मी विधानसभेचा सदस्य राहिलो आहे. या संपूर्ण कालावधीत आज पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होत असताना दुर्दैवाने मी गैरहजर असणार आहे. माझी तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी विश्रांती घेत आहे.'
अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करताना शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषाणात जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.