Sangli Zilla Parishad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP president : सांगली ZP सत्तास्थापनेत मोठा ट्विस्ट : रोहित पाटलांचे 7 सदस्य गैरहजर राहणार? जयंत पाटलांकडून अखेरच्या क्षणी सभापतीपदाचा शब्द

Sangli Zilla Parishad president : सांगलीतील अध्यक्ष पदाचा उमेदवार आमदार सुहास बाबर यांच्या कुटुंबातील असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी सुहास बाबर यांच्याकडून फिल्डिंग लावण्यात आली आहे.

Rahul Gadkar

Sangli News, 18 Mar : सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठं राजकारण सुरू झालं आहे. एकीकडे महायुतीत असूनही सांगली झेडपीला विरोधात लढलल्या शिवसेना आणि भाजपमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटातूनही नवी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे आमदार रोहित पाटलांचे 7 सदस्य गैरहजर राहणार असल्याचं बोललं जात आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांचे दोन सदस्य आघाडीतून बाहेर पडले आहेत.

मात्र ते अद्याप भाजपसोबत गेलेले नाहीत. तर दुसरीकडे सांगलीतील अध्यक्ष पदाचा उमेदवार आमदार सुहास बाबर यांच्या कुटुंबातील असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी सुहास बाबर यांच्याकडून फिल्डिंग लावण्यात आली आहे. त्यासाठी आमदार रोहित पाटील यांचे सात सदस्य गैरहजर राहतील यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

मात्र, जेष्ठ नेते जयंत पाटील यांचे पाच वर्षे समाज कल्याण सभापती पद रोहित पाटील यांच्या आदेशाने दिले जाणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे रोहित पाटील यांचे सदस्य अनुपस्थित राहणार नाहीत आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूनेच मतदान करतील असा दावा आबा गटाकडून केला जात आहे.

तर सुहास बाबर यांच्याकडील तीन सदस्य फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा असून बाबर यांची उमेदवारी नसल्यास महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय या सदस्यांनी घेतल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसलाच मतदान करण्यावर शिवसेनेचे तीन सदस्य ठाम आहेत.

महाविकास आघाडीकडे 36 सदस्यांचे बहुमत असल्याचा दावा जयंत पाटलांच्या समर्थकांकडून केला जात आहे. तर काहीही झालं तरी भाजप सत्ता सोडणार नाही, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांकडून दावा केला जात आहे. त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेत नेमका अध्यक्ष कोणाचा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT