Sangli ZP News : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अवघे दोन तास राहिले असताना महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीकडून कासेगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य संगीता पाटील यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. तर, उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे कुंडल जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आज दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा पार पडणार आहे पाडणार आहे. दरम्यान, वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जिल्हा परिषद गटाचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सदस्य अभिजीत पाटील जिल्हा परिषदेत अर्ज घेण्यासाठी दाखल होते. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे.
दरम्यान, एक वाजता उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे कोण माघार घेणार याची देखील चर्चा रंगू रागली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या भूमिकेवर अध्यक्षपद कोणाकडे राहणार हे निश्चित होणार आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून भाजपने माघार घेत अध्यक्षपदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठींबा दिला आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून नागेवाडी जिल्हा परिषद सदस्य शीतल बाबर या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपकडून उपाध्यक्षपदासाठी जयराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपकडून देखील अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या डफळापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य स्वप्नाली मासाळ यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.