Sangola Bazar Samiti Results
Sangola Bazar Samiti Results  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Bazar Samiti Results : सांगोल्यात देशमुखांच्या सहमतीच्या राजकारणाला पसंती; बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनल !

सरकारनामा ब्यूरो

दत्तात्रय खंडागळे

Sangola News : सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे सत्तारूढ शेतकरी विकास आघाडीचे सर्व 16 उमेदवार विजय झाले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'स्व. गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh)परिवर्तन महाविकास आघाडी' स्थापन करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दंड थोपटले होते. परंतू, तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांची एकी झाल्यामुळे परिवर्तन आघाडीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. परिवर्तन आघाडीचे सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत.

शेकाप(Shetkari Kamgar Paksha) पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप इत्यादी पक्षांना घेऊन जागा वाटप केले होते. परंतू, शेकाप पक्षातीलच माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी नाराजी व्यक्त करत बंड केले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांनी आपला उमेदवार अर्ज कायम ठेवत साथ दिली होती.

हमाल, तोलार व ग्रामपंचायतच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट या अगोदरच सत्ताधाऱ्यांच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. सत्ताधारी शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या शेतकरी विकास आघाडीने सर्व 18 जागा जिंकत आपला गड पक्का केला आहे तर परिवर्तनला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना धक्का बसला आहे.

परिवर्तनच्या गायकवाडांचाही पराभव

परिवर्तन आघाडीमध्ये ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड सामील झाल्यामुळे या आघाडीला नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे परिवर्तन आघाडी थोडेफार परिवर्तन घडवेल असे वाटत होते. परंतु या निवडणुकीमध्ये बाबुराव गायकवाड यांचाही निसटता पराभव झाल्याने संपूर्ण परिवर्तन आघाडीलाच दारुण पराभवास सामोरे जावे लागले.

97 टक्के झाले मतदान

दोन जागा बिनविरोध निवडल्यानंतर राहिलेल्या 16 जागेसाठी 2 हजार 19 मतदारांपैकी 2 हजार 18 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे या निवडणुकीमध्ये एकूण 97 टक्के चुरशीने मतदान झाले.

विजा/विमाप्र) गटातून - संतोष हरिदास देवकते (792)

सहकारी संस्था मतदारसंघ (सर्वसाधारण) - आबासो ज्ञानू आलदर (753), बाळासो निवृत्ती काटकर (741), विनायकराव अनंतराव कुलकर्णी (754), अमोल मुरलीधर खरात (743), धनाजी गणपत पवार(755), हेमंतकुमार साहेबराव शिंदे (748), विष्णू नामदेव सरगर (748).

सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग - दीपक बाळासो गोडसे (789).

सहकारी संस्था मतदार संघ (महिला राखीव) - प्रमिला शिवाजी चौगुले (801), शोभा विजय पवार (818).

ग्रामपंचायत मतदार संघ (अनुसूचित जाती- जमाती) - माणिकचंद ताराचंद वाघमारे (509),

ग्रामपंचायत मतदार संघ (सर्वसाधारण) - समाधान शेषनारायण पाटील (389), किशोर भानुदास शिंदे (492).

- व्यापारी मतदारसंघ -

राम नारायण बाबर (158), अमजद शब्बीर बागवान (206).

हमाल तोलार गट - दगडु संभाजी गावडे (बिनविरोध)

आर्थिक दुर्बल गट - चंद्रकांत भीमराव कारंडे (बिनविरोध).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT