Akole Bazar Samiti: पिचड पितापुत्रांना धक्का; लहामटे-गायकरांनी पिचडांकडून अकोले बाजार समिती हिसकावली

Akole Market Committee Election : अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पिचड गटाला पराभव स्वीकारावा लागला होता.
Akole Market Committee Election
Akole Market Committee ElectionSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर अनेक बाजार समित्यांचे निकालही आजच समोर आले आहेत. यातच नगर जिल्ह्यातील अकोले बाजार समितीचा निकाल समोर आला असून यामध्ये मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांना मोठा धक्का बसला आहे.

अकोले बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गटाच्या 11 जागांवर दणदणीत विजय झाला आहे. तर पिचड गटाला अवघ्या सात जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अकोले बाजार समितीच्या निवडणुकीत पिचडांना मोठा धक्का बसला आहे.

Akole Market Committee Election
Shevgaon Bazar Samiti Results: शेवगाव बाजार समितीवर चंद्रशेखर घुलेंनी एकहाती सत्ता मिळवली

अकोले बाजार समिती ही अनेक वर्ष पिचडांच्या ताब्यात होती. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी मोठी ताकत लावत पिचड गटाचा पराभव केला. या निवडणुकीसाठी किरण लहामटे आणि सिताराम गायकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Akole Market Committee Election
Newasa Bazar Samiti Results: बाळासाहेब मुरकुटेंना धक्का; शंकरराव गडाखांच्या गटाचा 18 जांगावर दणदणीत विजय

अकोले बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित शेतकरी समृध्द पॅनलला 11 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपच्या पिचड गटाला फक्त सात जागा मिळाल्या आहेत.

अकोले बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पिचड गटाच्या पदरी निराशी पडली आहे.

आता या बाजार समितीवर किरण लहामटे आणि सिताराम गायकर यांच्या गटाच्या ताब्यात आली आहे. दरम्यान, याआधी अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पिचड गटाला पराभव स्वीकारावा लागला होता.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com