सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला (Sangola) येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने (PWP) आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत १७ जागेसाठी १७ अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक अविरोध झाली. शेतकरी कामगार पक्षाने १४ जागा आपल्याकडे राखत आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) आणि माजी आमदार दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांच्या गटाला तीन जागा दिल्या आहेत. सहकारी संस्थांमधील शेकापने आपले वर्चस्व अबाधित ठेवले असून आगामी नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sangola Kharedi-Vikri Sangh election unopposed)
सांगोल्यामधील शेतकरी सहकारी सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये शेकापला सर्व पक्षांनी सहकार्य केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. संघाच्या १७ जागांसाठी ६० अर्ज दाखल झाले होते, त्यामधील ५६ अर्ज वैध, तर चार अवैध ठरले होते.
या निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी १४ जागा या शेतकरी कामगार पक्षाला, तर तीन जागा या आमदार शहाजी पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांना सोडून निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. शेतकरी सहकारी सूतगिरणीनंतर खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत शेकापने आपले सहकारी संस्थेतील वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
बिनविरोध संचालक
दीपक दत्तात्रय चोथे, विशालदीप विजयसिंह बाबर, बिरा रामचंद्र चोरमले, तुकाराम गणपती भुसनर, वैभव जगन्नाथ केदार, प्रल्हाद सोपान येवले, सुभाष कृष्णदेव पाटील, सिंधू विठ्ठल कोळवले, पोपट रामचंद्र गडदे, नारायण शिवाजी जगताप, धोंडीबा यशवंत जानकर, चंद्रशेखर भीमाशंकर ताठे, मारुती तुकाराम हातेकर, रमेश पांडुरंग जाधव, उषादेवी सिद्धेश्वर लोखंडे, कृष्णदेव भागवत भोसले, हरिबा यशवंत इंगोले.
झेडपी, पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष
माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी सहकारी सूत गिरणीची निवडणूक लागली होती. त्या निवडणुकीत शेकापने आपले वर्चस्व राखत विरोधकांसह ही निवडणूक बिनविरोध केली. त्यानंतर शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूकही बिनविरोध झाली. त्यामुळे तालुक्यातील नवीन राजकीय परिस्थिती पाहता विविध पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांकडेच लक्ष द्यावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.