Sanjay Bhokare Murder conspiracy sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena UBT : सुपारी, कट अन् ठाकरे शिवसेना! शिक्षणसंस्था अध्यक्षाच्या खुनाचा प्लॅन पोलिसांनी फसवला

Sanjay Bhokare Murder conspiracy : जमिनीच्या वादातून अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष तथा एका दैनिकाचे मालक आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांच्या कट पोलिसांनी उधळला असून शस्त्रांसह तिघांना अटक केली आहे.

Aslam Shanedivan

  1. संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी दोन देशी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

  2. या प्रकरणात सुपारी देणारा आणि घेणारा दोघेही ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित कार्यकर्ते असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  3. एका संशयिताचा शोध सुरू असून न्यायालयाने अटक आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sangli Crime news : जमिनीच्या वादातून मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांचा खुनाचा कट रचण्यात आला होता, मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने हल्ला करणाऱ्यापूर्वीच तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी संशयित गणेश चंद्रकांत लोखंडे (वय ३३, हरिपूर रस्ता, सांगली), विराज प्रकाश बुटाले (४१, आंबेडकर रस्ता, सांगली), संग्राम संभाजी फडतरे (वय २७, हरिपूर रस्ता, सांगली) या तिघांना अटक केली; तर सचिन आवळे (सांगलीवाडी) हा पसार आहे. संशियतांकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल, चार काडतुसे, चाकू, चारचाकी जप्त केली आहे, ’ अशी माहिती अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अपर अधीक्षक बारवकर म्हणाल्या, ‘उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक शहरात गस्तीवर असते. काही तरुण एका महत्त्वाच्या व्यक्तीचा खून करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अंमलदार संदीप पाटील, संकेत कानडे, अभिजित माळकर यांना खबऱ्यांमार्फत मिळाली.

त्यानुसार पाटणे प्लॉट ते अंकली रस्त्यावरील काळीवाट परिसरात संशयास्पदरीत्या आढळलेल्या गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम फडतरे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी चारचाकीमध्ये (एमएच १०, ए बी ५९३५) गणेश व विराजच्या कमरेला पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळाली.

मिरजेतील भोकरे अभियांत्रिकी कॉलेजजवळील दोन एकर जमीन ही पूर्वीपासून अंबाबाई तालीम संस्थेची असून, भोकरे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. या जागेच्या काही भागावर सचिन आवळे दावा करत आहे. भोकरे यांना संपविले, तर सहजासहजी जमीन ताब्यात घेता येईल, असा कट शिजला. या जमीनीच्या विक्रीतून आर्थिक मोबदला देतो, असे आवळे याने विराजला सांगितले.

विराजने भोकरे यांना ठार मारण्यासाठी गणेश व संग्राम यांना देशी बनावटीचे दोन पिस्तूल आणण्यासाठी पैसे दिले. पिस्तूल आणल्यानंतर तिघांनी भोकरे सांगलीतील कार्यालयात केव्हा-केव्हा येतात, याची माहिती काढली आणि त्यांनी हल्ल्याचा कट रचला, मात्र तो पोलिसांनी उधळून लावला, अशी माहिती बारवकर यांनी दिली.

विराज आणि गणेश हे ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. लोखंडे याची वीटभट्टी आहे; तर बुटाले याचा मद्यविक्रीचा व्यवसाय आहे. या कारवाईत ‘गुन्हे अन्वेषण’चे निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार अमोल ऐदाळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संकेत कानडे, अभिजित माळकर, रोहन घस्ते आदींचा सहभाग होता. शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर होळकर हे तपास करत आहेत.

FAQs :

1. संजय भोकरे कोण आहेत?

संजय भोकरे हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे संघटक आणि श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आहेत.

2. या प्रकरणात किती आरोपींना अटक झाली आहे?

या हत्या कट प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून एक संशयित अद्याप फरार आहे.

3. पोलिसांनी आरोपींकडून काय जप्त केले?

दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

4. या प्रकरणाचा राजकीय संबंध काय आहे?

प्राथमिक माहितीनुसार सुपारी देणारा आणि घेणारा हे ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

5. आरोपींना न्यायालयाने काय आदेश दिले?

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT