raju shetti sarkaranama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : संजय घाटगेंना भाजपमध्ये घेऊन शक्तिपीठ महामार्गाचा विरोध केला बोथट ; राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा

Sanjay Ghatge BJP News : शेतकऱ्यांची भाषा बोलणाऱ्या घाटगे यांनी आता राज्य सरकारची भाषा बोलण्यास सुरुवात केल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा लगावला आहे.

Rahul Gadkar

Kolahapur News : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातून विरोध करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यू टर्न घेतला आहे. विरोध करण्यासाठी पुढे असणाऱ्या माजी आमदार संजय घाटगे यांना देखील भाजपमध्ये घेऊन शक्तिपीठ महामार्गाचा विरोध आणखी बोथट केला. शेतकऱ्यांची भाषा बोलणाऱ्या घाटगे यांनी आता राज्य सरकारची भाषा बोलण्यास सुरुवात केल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा लगावला आहे.

शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांच्यावर कोल्हापूर महानगरपालिकेने कारवाई केल्याच्या विरोधात गुरुवारी इंडिया आघाडीच्या वतीने महापालिकेवर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी माजी खासदार राजू शेट्टी (Raju shetti) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

शेट्टी म्हणाले, 'कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले, विरोध बोथट केला तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला. एकट्या महामार्गासाठी 86 कोटी खर्च करणे म्हणजे, सरकारचा चिंधीचोरपणा असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत, ठिबक सिंचनचे तीन वर्षांचे अनुदान रखडले आहे. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून अनेक वर्ष वंचित आहे. अनेक शासकीय योजनांच्या निधीला कात्री लावलेली असताना कोणाची मागणी नसताना हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा सरकारने घाट घातलेला असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

30 हजार कोटीत रस्ता करायचा, वरचे 50 हजार कोटी हडप करण्याचा डाव आहे. हे कदापी होऊ देणार नाही. महामार्ग प्रकरणात राजकीय नेत्यांचा सहभाग आहे. त्यांना यातून पैसा कमवायचा आहे, ठेकेदारांना पोसण्यासाठी खासगी क्षेत्रातील अनेकांशी हितसंबंध जोपासायचे आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT