Sanjay Ghatge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Ghatge : माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजप प्रवेश का थांबला?

Sanjay Ghatge joins BJP : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांनी लोकसभेपाठोपाठ विधानसभेला विरोधी भूमीका घेतली होती. याच विरोधी भूमीकेचा फायदा विधानसभेवेळी मंत्री हसन मुश्रीफ यांना झाला.

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेला सुरूंग लावण्याचे काम माजी आमदार संजय घाटगे यांनी केले होते. त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला होता. यानंतर त्यांच्या हाकालपट्टीच्या चर्चा रंगल्या असतानाच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या महिनाभरापासून जोरदार रंगल्या होत्या. त्यांचा 12 जानेवारी रोजी भाजप प्रवेश होईल, असेही बोलले जात होते. मात्र अद्यापही त्यांचा भाजप प्रवेश झालेला नाही.

आमदार संजय घाटगे यांनी राज्यातील महायुतीला पोषक अशीच भूमीका घेतली आहे. यामुळेच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहून त्यांनी राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पूरक असताना त्यांनी भाजपचा रस्ता का निवडला? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या प्रश्नांची उकल होत नसताना त्यांच्या भाजप प्रवेशाचं काय झालं? अशी कुजबुज सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार संजय घाटगे यांनी पाठिंबा दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार समर्जीत घाटगे यांना पाठिंबा देणे अपेक्षित असताना राजकीय सोयीस्कर भूमिका घेत घाटगे यांनी महायुतीला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामागे पुत्र आणि गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांच्या राजकीय भवितव्याची चिंता घेऊन घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याचे समजते.

मात्र विधानसभा निवडणुकीनंतर घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात रंगली होती. वास्तविक राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी हा पक्ष पूरक ठरू शकला असता. कागल मतदारसंघाच्या राजकारण पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुत्र अंबरीश घाटगे यांचा मार्ग देखील सुकर झाला असता. मात्र तसे न करता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांनी भेट घेतली. आणि आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले.

पण संजय घाटगे यांनी भाजप पक्ष का निवडला याबाबत तर्क वित्तर्क लढवले जात होते. भाजपमधून महाविकास आघाडीत गेलेले समरजित घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये जाऊ नयेत यासाठी संजय घाटगे यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्लॅन कोणाचा? असेही आता सवाल अनेकांच्या मनात घोळत आहे.

तर हाच प्रश्न आता खुलेआम चौकाचौकात चघळला जात आहे. दरम्यान 12 जानेवारी रोजी संजय घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात होता. मात्र 12 जानेवारी उलटून गेल्यानंतर संजय घाडगे यांचा भाजप प्रवेश का झालेला नाही? याची चर्चाही आता जोरात सुरू आहे. भाजप प्रवेशावर संजय घाटगे यांनी देखील बोलायला नकार दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT