Sanjay Ghatge: ठाकरे गटाच्या माजी आमदाराला मिळाली परतफेड; पाठिंबा दिल्याने मुश्रीफांकडून मोठं 'गिफ्ट'

Kolhapur Politics Sanjay Ghatge appointed KDCC Bank Director: महिना अखेर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दोन स्वीकृत संचालक पदाच्या जागा रिक्त आहेत.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कागल विधानसभा निवडणूक अत्यंत अटीतटीची होताना पाहायला मिळत आहे. महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीकडून समरजीत सिंह घाटगे यांची संभाव्य उमेदवारी निश्चित मानली जाते.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विजयासाठी शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तर आघाडी धर्म बाजूला ठेवून पक्षाच्या विरोधात जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार संजय घाटगे यांनी देखील पालकमंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे.

या पाठिंब्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र घाटगे गटाला कायमचे बांधून घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार संजय घाटगे यांचं नशीब पुन्हा एकदा उजळवले आहे.

मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्यानंतर मुश्रीफ यांनी त्याची परतफेड म्हणून माजी आमदार संजय घाटगे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेत स्वीकृत संचालकपदी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Hasan Mushrif
Laxman Pawar: निवडणुकीपूर्वीच भाजप आमदाराचा धक्कादायक निर्णय; फेसबूक पोस्ट करीत दिली माहिती...

संचालक मंडळाच्या बैठकीत महिना अखेर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दोन स्वीकृत संचालक पदाच्या जागा रिक्त होत्या. यातीलच एक जागा घाटगे यांना देणार असल्याने अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर नाराजीची वेळ आली आहे. घाटगे यांच्या नियुक्तीनंतरही संचालक मंडळात दोन जागा रिक्त राहतात. त्यापैकी शासन नियुक्त व स्वीकृत अशा दोन पदांवर अन्य इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पालकमंत्री मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे यांच्यात आतापर्यंत सहा वेळा समोरासमोर विधानसभा निवडणूक झाली आहे. त्यातील एका निवडणुकीचा अपवाद वगळता मुश्रीफ सलग पाच वेळा आमदार झाले.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत घाटगे यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे हे मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र माजी आमदार संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांनाच पाठिंबा दिल्यानंतर अंबरीश घाटगे यांचे आव्हान संपुष्टात आले. गेल्या पाच ते सहा वर्षाचा कालावधी लक्षात घेतल्यास मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील संबंध अत्यंत ऋणानुबंध आहेत.

Hasan Mushrif
Nagpur Audi Accident: ...म्हणून संकेत बावनकुळेंवर कारवाई नाही!

मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेतून घाटगे यांना कारखान्यासाठी कर्ज दिले आहे. कोल्हापूर व गडहिंग्लज बाजार समितीतही घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना मुश्रीफ यांनी संधी दिली. तेव्हापासून या दोघांतील सख्य वाढतच गेले. त्यामुळे आगामी काळात घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. माजी आमदार संजय घाटगे कोल्हापूर जिल्हा बँकेत स्वीकृत संचालक करण्यासाठी मुश्रीफ यांनी डाव आखला आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वी झालेली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी अनेकांना शब्द दिले होते. माजी संचालक आसिफ फरास, विलास गाताडे हे राष्ट्रवादीकडून गोपाळराव पाटील यांना काँग्रेसकडून उर्वरित दोन जागेवर स्वीकृत संचालक घेतले जाईल अशी शक्यता होती. मात्र घाटगे यांची निवड जवळपास निश्‍चित झाल्याने उर्वरित एका जागेवर कोणाचा पत्ता कट होणार याविषयी उत्सुकता आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com