Kolhapur Lok Sabha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha 2024 मंडलिकांचे के.पी. पाटलांना भावनिक आवाहन, म्हणाले, "झालं गेलं विसरून सहकार्य करा..."

Kolhapur Politics: के. पी. यांनीही अजित पवार यांच्या निर्णयानुसार आपण आघाडी धर्म पाळणार असल्याचे सांगत मंडलिकांना आश्वासित केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झालेले आणि इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Election 2024)कोणाची उमेदवारी असणार हे अजून जाहीर झालेले नाही. तरी ही जागा शिंदे गटाकडे असल्याचे सांगितले जात आहे. तरी उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

महायुतीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप किंवा शिंदे गटाला मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा आणि पक्ष विस्ताराचा हक्क आहे. यात काहीही नवल नाही. मात्र, विद्यमान म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी निश्चित आहे. उमेदवारी घोषित झाल्यानंतर सर्वजण मिळून माझ्या विजयासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांची कारखान्याच्या प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीवेळी केलेले आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग होता, परंतु आता झालं गेलं विसरून लोकसभेला सहकार्य करा. उमेदवारीचे काहीही होवो, आपला आशीर्वाद राहू द्या, असे भावनिक आवाहन मंडलिक यांनी केले. या वेळी के. पी. यांनीही अजित पवार यांच्या निर्णयानुसार आपण आघाडी धर्म पाळणार असल्याचे सांगत मंडलिकांना आश्वासित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिद्रीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या विरोधी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व करणारे खासदार मंडलिक हे सोमवारी पहिल्यांदाच के. पी. पाटील यांची भेट घेण्यासाठी कारखान्यात आले होते. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप यांची सत्ता आहे. त्या आघाडीनुसार खासदार मंडलिक लोकसभेसाठी मोर्चबांधणी करीत आहेत. त्यानुसार त्यांनी सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान के. पी. पाटील म्हणाले की, साखर कारखान्यासंबंधी केंद्राचे धोरण हिताचे नाही. त्यावर आपण सातत्याने संबंधित मंत्र्यांशी यावर चर्चा केली असल्याचे मंडलिक यांनी स्पष्ट केले. मंडलिक व के. पी. पाटील यांची बंद खोलीत सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली.

या भेटीवेळी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी मंडलिकांचा सत्कार केला. दरम्यान, आजच बिद्रीचे ९ लाख टन गाळप पूर्ण झाले. हा मोठा टप्पा आहे असे सांगत खासदार मंडलिक यांनी अध्यक्ष के. पी. यांच्या कामाचे कौतुक केले. अध्यक्ष पाटील यांनीही वेळात वेळ काढून बिद्रीचे इथेनॉलसह अन्य प्रकल्प पाहण्यासाठी यावे, असे मंडलिकांना सांगितले. मंडलिक व अध्यक्ष के. पी. पाटील यांची बंद खोलीत सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT