- संदीप चव्हाण
'जवळी येता निवडणुका, साद घालती इच्छुका...' या उक्तीनुसार पुण्यातल्या 'जय-वीरू'च्या जोडीनं, 'मी पुणे लोकसभेसाठी इच्छुक,' असं म्हणत आपल्या बाह्या मागं सारल्या. काही काळ दोघांत तणातणीही झाली. पण, मागं सारलेल्या बाह्या पुन्हा पुढं करण्यापलीकडं दोघांच्या हाताला काही लागलं नाही. ना 'जय'ला तिकीट मिळालं ना 'वीरू'ला... मग काय आलं दोघांच्या वाट्याला..?
फ्लॅशबॅक : प्रसंग पहिला
जय : मी 'राज'मार्गावर... साहेबांना कधीच सोडून जाणार नाही. मी पुणे लोकसभा लढवण्यास इच्छुक!
वीरू : मी पण साहेबांचा पाईक! मलाही पुणे लोकसभा लढवायचीये; मी दिल्लीला गेल्याचं स्वप्न वहिनीसाहेबदेखील पाहातायत...
जय : वहिनीसाहेबांना आम्हा दोघांना (जय-वीरू) दिल्लीत गेल्याचं पाहायचंय; एकट्या 'वीरू'ला नव्हे!
वीरू : 'साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण'... कळेलच लवकर!
जय : काय दिलं नाही मी 'वीरू'ला... गटनेता बनला माझ्यामुळं, शहराध्यक्ष बनला माझ्यामुळं... छत्रपती शिवरायांचा पोशाख परिधान करायला मिळाला माझ्यामुळं...! मी तर 'पुण्याची पसंत...'
वीरू : साहेबांचा विश्वास माझ्यावर... सैनिकांचं प्रेम माझ्यावर!
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जय : 'वीरू'ला तिकीट मिळालं तर मी प्रचाराला सर्वांत पुढं असेन.
वीरू : 'जय'ला तिकीट मिळालं तर मी प्रचाराला सर्वांत पुढं असेन.
फ्लॅशबॅक : प्रसंग दुसरा
जय : 'मी' नाराज! स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सापत्नपणाची वागणूक... मी माझ्याच पक्षातील काहींना खटकतोय. मला इतर पक्षांकडून ऑफर... तरीही मी 'राज'मार्गावर !
वीरू : यावर मला काही बोलायचं नाही. पक्षात सारं काही 'ऑल इज वेल'
जय : "अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा"
वीरू : सॉरी... नो कमेंट प्लिज! साहेबांच्या हुकूमावरून...
जय : (पत्रकार परिषद) 'साहेबांचा माझ्यासाठी एका पदाधिकाऱ्याला फोन... पण आता मीच कापलेत माझ्या परतीचे दोर..!'
वीरू : (थेट पक्षीय कार्यालयातून पत्रक) 'पक्षाकडून वसंत मोरे यांच्या बरोबर कुणीही कशाही स्वरूपाचा संपर्क केलेला नाही, याची नोंद घेण्यात यावी'
जय : (इतर पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू) 'एक नवी दिशा जी माझ्या पुण्याच्या हिताची असेल...'
वीरू : सॉरी... नो कमेंट प्लिज ! साहेबांच्या हुकूमावरून... आदेश आल्यावर टीकेला प्रत्त्युत्तर दिलं जाईल !
उद्याचं काय ?
जय : बघू... अपक्ष लढू !
वीरू : मी काय बोलणार ? साहेब म्हणतील तसं !
ब्रेकिंग न्यूज
साहेब तातडीनं दिल्लीला रवाना...
साहेब पोचलेही दिल्लीत, पण दिल्लीला जाण्याचं स्वप्न पाहणारे 'जय-वीरू' मात्र अजूनही पुण्यातच..
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.