Kolhapur LokSabha Election 2024: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Mandlik News: मंडलिक, माने यांचे शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांच्या उपस्थित आज अर्ज दाखल करणार

Kolhapur LokSabha Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील नेते सहभागी होणार आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur LokSabha Election 2024: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक (Darishsheel Mane) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मोठे शक्‍तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. गांधी मैदानात सर्व कार्यकर्ते एकत्र येतील.

Kolhapur News: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि धैर्यशील माने (Darishsheel Mane) हे आज शक्‍तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील नेते सहभागी होणार आहेत. आज सकाळी अजित पवार हे कोल्हापूर Kolhapur LokSabha Election 2024) विमानतळावर दाखल होणार असल्याची माहिती आहे. या वेळी गांधी मैदान ते खानविलकर पेट्रोल पंप या मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीची खरी रंगत अर्ज भरल्यानंतर वाढणार आहे. शुक्रवार (ता. १२) ते शुक्रवार (ता. १९) या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मोठे शक्‍तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. गांधी मैदानात सर्व कार्यकर्ते एकत्र येतील. तेथून बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीपीआर चौक आणि खानविलकर पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील. दरम्यान, छत्रपती शिवाजी चौक आणि खानविलकर पंप चौक येथे सभा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या रॅलीमध्ये राज्य नियोजन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, भाजप नेते समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के. पी. पाटील, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, अशोक चराटी, महेश जाधव, भैया माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले जाणार आहेत.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT