Sanjay Mandlik.jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Mandlik News : ...अन् संजय मंडलिकांनी 'गोल्डन मॅन'ला स्वतः चढवले दागिने

Kolhapur Shivsena Politics : संजय मंडलिक यांचा पराभव झाल्याने त्यांनी दागिने घालण्याचा मोह टाळला होता. अखेर ही गोष्ट माजी खासदार मंडलिक यांना समजताच त्यांनी स्वतः हे दागिने शिराळे यांच्या अंगावर चढवले.

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना विजयी केल्याशिवाय गळयात दागिने घालणार नाही, अशी शपथ कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठ-बुधवार पेठेतील नगरसेवक आणि गोल्डन मॅन म्हणून ख्याती असलेले किरण शिराळे यांनी घेतली होती. मात्र, लोकसभेत पराभव झाल्यानंतर शिराळे यांनी आपले दागिने काढून ठेवले होते.

खरेतर दागिने घालून फिरणे हा त्यांचा नेहमीचा छंद आहे. अंगावर जवळपास तीन-चार किलो पेक्षा अधिक सोने असल्याने त्यांची शहरात 'गोल्डन मॅन' म्हणून ओळख होती. मात्र, संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा पराभव झाल्याने त्यांनी दागिने घालण्याचा मोह टाळला होता. अखेर ही गोष्ट माजी खासदार मंडलिक यांना समजताच त्यांनी स्वतः हे दागिने शिराळे यांच्या अंगावर चढवले.

माजी खासदार संजय मंडलिक यांनी माजी नगरसेवक किरण शिराळे यांची भेट घेत त्यांची समजूत काढली. यावेळी शिराळे हे भावुक झालेले दिसले. यावेळी बोलताना मंडलिक यांनी शिराळे यांना अंगावर दागिने घालण्याची विनंती केली. मंडलिक यांनी स्वतः त्यांच्या अंगावर दागिने चढवले.

कोल्हापूर (Kolhapur) शहरातील प्रभाग क्र.३० मधील माजी नगरसेवक किरण शिराळे यांनी या सगळ्या प्रभागातून लोकसभा निवडणूकीमध्ये माझा प्रचार केला आहे. त्यांनी मला मोठे मताधिक्य दिले आहे. माझा पराभव झाल्यास हे दागिने मी काढून ठेवीन अशी शपथ घेतली होती. दुर्दैवाने माझा प्रभाव झाला. खरं म्हटलं तर कोल्हापूरचा गोल्डन मेॅन म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांनी एक निर्धार केला होता. त्या पद्धतीने आपला निर्धार त्यांनी पूर्ण केला दागिने न घालायचा त्यांनी त्याग केला.

पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. जय पराजय हा होतच असतो. जय पराजया पेक्षा तुम्ही निरर्थक राहून जे मताधिक्य दिल त्याबद्दल आभार मानून विनंती करत आहे. ज्या प्रमाणे आपली ख्याती आहे, तशीच राहावी व आपण दागिने पुन्हा परिधान करावे अशी इच्छा संजय मंडलिक यांनी व्यक्त केली.

लोकसभेला जे सहकार्य आपण केले त्याबद्दल आपले आभार व्यतक्त करतो. या पुढच्या काळामध्ये सामाजिक कार्य या विभागामध्ये चालू आहे. हे अधिक गतीने चालू राहावं अधिक ताकदीने युतीची शक्ती या भागामध्ये चालू राहावी अशी इच्छा माजी खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT