Sangli Politics; Former MP Sanjay Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : माजी खासदार संजयकाका पाटील यांना धक्का : निश्चित झालेला भाजपप्रवेश लांबणीवर, पक्षातील विरोधाची चर्चा

Former MP Sanjay Patil BJP Entry Postponed : माजी खासदार संजय पाटील यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून तो 30 जून रोजी होणार होता.

Aslam Shanedivan

Sangli BJP Leaders Oppose Sanjay Patil Entry News : भाजपमधून ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी खासदार संजय पाटील पक्षात कधीच रमले नाहीत. उलट स्व-गृही परतण्याचे त्यांना वेध लागले होते. आता त्यांचा मंगळवारी (ता. 30) त्यांचा पक्ष प्रवेश होणार होता. तशी घोषणानाच भाजपचे जेष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

मात्र आता हा पक्ष प्रवेश रखडल्याचे समोर येत असून सांगलीतील भाजपच्या नेत्यांनीच संजयकाका पाटलांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आहे. त्यामुळे सध्यातरी हा प्रवेश लांबणीवर पडला असून अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील प्रमुख मंडळींचा एकत्रित प्रवेश घेतला जाईल असा निरोप भाजपच्या वरिष्ठ गोटातून त्यांना देण्यात आल्याचेही आता समोर येत आहे. यामुळे माजी खासदार संजयकाका पाटील यांना धक्का जोरदार धक्का बसल्याची सांगली राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना झाल्यानंतर विधानसभा निवडणुकी वेळी संजयकाका पाटील यांनी दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिवंगत आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांच्याविरोधात दंड थोपाटले होते. तासगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र तेथेही त्यांना रोहित पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

यानंतरच ते अनेकदा भाजपच्या व्यासपीठावर दिसले. तसेच भाजपच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यामुळे ते राष्ट्रवादीत रमत नसल्याचे तर भाजपमध्ये ते जातील अशा चर्चा सुरू झाल्या. यादरम्यान त्यांची भाजपशी जवळीक पुन्हा वाढली, मात्र त्यांचा प्रवेश होत नव्हता.

अशातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजयकाका आमच्या सोबतच आहेत. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीसच निर्णय घेतील असे वक्तव्य करत त्यांच्या प्रवेशाची दारे उघडी केली. यानंतर सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कराड येथे संजयकाका पाटील यांच्याशी भेट झाली. त्यानंतर सांगलीत आल्यानंतर विट्यातही त्यांच्या घरी जात भेट देखील घेतली. या भेटीतच त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची चर्चा आहे.

तर संजयकाका पाटील यांचा 30 जून रोजी मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याबाबत चर्चा झाली सुरू झाली. ज्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्कामोर्तब केला. त्यांनी, माजी खासदार संजय पाटील यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून, विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या 30 जून रोजी त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, संजयकाका पाटील भाजपचेच होते, फक्त तांत्रिक कारणाने राष्ट्रवादीत गेले होते. तिकडे ते फार रमले नाही. आता ते परत येताहेत आणि ते आमचेच आहेत. ते आमच्या पक्षातील प्रस्थापित नेते आहेत, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. यामुळे संजयकाका पाटील यांच्या गटात जोरदार तयारी केली जात होती.

अशातच त्यांच्या पक्षप्रवेशाला सांगलीतील भाजप नेत्यांकडूनच विरोध करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे 30 जूनला होणार पक्ष प्रवेश आता लांबणीवर पडला आहे. तर अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील प्रमुख मंडळींचा एकत्रित प्रवेश घेतला जाईल असा भाजपच्या वरिष्ठ गोटातून त्यांना निरोप देण्यात आला आहे. दरम्यान आता पक्षातंर्गत होणाऱ्या या विरोधामुळे संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेशाच्या ब्रेक लागला आहे. तर अधिवेशन संपल्यानंतर तरी त्यांचा प्रवेश होतो काय याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT