

Gopichand Padalkar News : विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील पक्ष यांचा गट फुटणार आहे, असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. दिवा विझताना मोठा होतो, तशीच जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे.', अशी टीका देखील त्यांनी केली.
सांगली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन नगरसेवक भाजपमध्ये आलेत यापुढेही अनेक गट जयंत पाटील यांची साथ सोडतील, असा दावा त्यांनी केला. सांगली जिल्हा बँकेच्या विविध विषयावरून आमदार पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी ते बोलत होते.
कर्नाटकातील एका कारखान्याला महाराष्ट्रात ऑफिस दाखवून कर्ज देता, खासदार विशाल पाटील यांना कसे कर्ज देताय? पूर्वी थकीत असताना २७० कोटी कर्ज कसे देता? हे सारे प्रकार चौकशीत उघड होतील. त्यामुळे हे सगळे घाबरले आहेत. त्यामुळे पळवाट शोधायला ते न्यायालयात गेले आहेत. जयंत पाटलांचा पावडर लावलेला चेहरा उघडा पडणार आहे. रामाच्या मंदिरात हा रावण राहतो, हे लोकांच्या लक्षात येईल.' अशी टीका पडळकर यांनी केली.
जिल्हा बँकेची निवृत्त न्यायमूर्ती चौकशी करणार असल्याने जयंत पाटील घाबरले आहेत. चोऱ्या केल्याचे सिद्ध होत आहे. काहीच केले नव्हते तर चौकशीला का सामोरे गेले नाहीत. ते लपताहेत, कारण त्यांना गुन्हा केल्याची भीती आहे. आपला बाजार उठणार आहे, चोऱ्या लोकांसमोर येणार, हे त्यांना कळाले आहे. म्हणूनच ते न्यायालयात गेले, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.