Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Leader BJP Entry : राष्ट्रवादीचा माजी खासदार पुन्हा भाजपमध्ये परतणार? विधान परिषदेसाठी शिफारस?; चंद्रकांत पाटलांनी सगळंच सांगितलं

chandrakant patil statement On sanjay patil bjp entry : माजी खासदार संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या असून याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच भाष्य केले आहे.

Aslam Shanedivan

  1. संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

  2. त्यांच्या प्रवेशाचा अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार घेतील.

  3. महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळाचा निर्णयही जाहीर करण्यात आला.

Sangli news : माजी खासदार संजय पाटील यांचा सध्या भाजपमध्ये राबता वाढला आहे, हे खरे आहे; मात्र त्यांना भाजपमध्ये घेण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील. तूर्त संजय पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत काहीच चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. तसेच यावेळी त्यांनी ‘‘महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची मुदत सव्वा वर्षाची राहील,’’ असे ठरल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले, ‘संजय पाटील उद्धव ठाकरे सेनेचे नाहीत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाहीत, ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. आमच्या सहयोगी पक्षातील ते नेते असल्यामुळे भेटणे, एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणे येणे होत असते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ते नेते आहेत. तासगावची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची असल्यामुळे त्यांना तेथे मनाविरुद्ध लढावे लागले.

मात्र त्यांना तिकडे करमत नाही का, इकडे आणायचे का, याबाबत आता देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार ठरवतील. विधान परिषदेसाठी संजय पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे का? असा सवाल करण्यात आला होता. यावर, ‘ते अजून भाजपमध्येच आलेले नाहीत त्यामुळे शिफारशीचा प्रश्नच येत नाही’, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

दरम्यान ‘‘महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांत नगरसेवकांनी कार्यालय सुरू करावे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध राहावे. दर आठवड्यात बैठक घेऊन महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेणार आहोत,’’ अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली. ‘‘बैठकीत तक्रारी कमी, पण सूचना चांगल्या आल्या. आता दरमहा बैठक घेणार आहे. एकूण २० प्रभाग आहेत. तेथे नगरसेवकांनी प्रभाग कार्यालय करावे आणि ते दिवसभर उघडे ठेवावे.

नागरिकांना २० प्रकारचे दाखले मोफत द्यायचे. नगरसेवकांनी कामासाठी नागरिकांना उपलब्ध व्हावे. प्रत्येक प्रभागातील पाणी पुरवठ्यासह सर्व नागरी समस्या सोडवाव्यात. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, स्वच्छता कर्मचारी तेथे नियुक्त करावा. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांचे समाधान झाले पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘दर आठवड्याला मी स्वतः, दोन आमदार, महापौर, स्थायी सभापती, सभागृह नेता आणि आयुक्त यांची बैठक होईल. मागच्या आठवड्यात काय ठरले होते, त्याचे काय झाले, याबाबत चर्चा होईल. पाणी पुरवठा योजना, कुपवाड भूमिगत ड्रेनेज योजना, गॅस वाहिनी, पथदिवे या कामांचा आढावा घेतला जाईल.

‘वाद संपवण्याची यंत्रणा भाजपमध्ये’

पक्षांतर्गत मतभेदबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘जिवंत माणसांमध्ये मतभेद, भांडणे असतात. मात्र ते सोडवण्याची व्यवस्था झाली तर काही मुद्दाच राहत नाही. भांडणे मिटतात. वाद संपवण्याची यंत्रणा असेल तर प्रश्नच राहत नाही. भाजपमध्ये तशी यंत्रणा आहे.’’

‘स्वीकृत सदस्यांची मुदत सव्वा वर्षाची’

‘‘महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची मुदत सव्वा वर्षाची राहील,’’ असे ठरल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्यामुळे, ‘पाच वर्षांच्या काळात १६ जणांना संधी मिळेल. स्वीकृत सदस्य राजीनामा देणार का,’ यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘पक्षात देवेंद्र फडणवीस यांचा दरारा इतका आहे की कुणी राजीनामा न देण्याचे धाडस करणार नाही.’’

FAQs :

1. संजय पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का?
सध्या याबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही.

2. त्यांच्या प्रवेशाचा निर्णय कोण घेणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अंतिम निर्णय घेतील.

3. चंद्रकांत पाटील यांनी काय सांगितले?
त्यांनी स्पष्ट केले की सध्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा नाही.

4. स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ किती असेल?
त्यांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा राहणार आहे.

5. फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल काय विधान झाले?
पक्षात त्यांचा दरारा मोठा असल्याने कोणीही आदेश पाळण्यास नकार देणार नाही, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT